भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात एड्स जनजागृत रॅलीचे आयोजन..!
चाकूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून जनजागृत रॅलीला उपस्थिती.

भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात एड्स जनजागृत रॅलीचे आयोजन..!
मुख्य संपादक सुनिल जाधव मो.9766553995
चाकूर-भाई किशनराव देशमुख महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व शासकीय ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यामाने शहरातून एड्स जनजागरण रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप ढेले व जिल्हा कार्यक्रम अधिकारी बिपिनचंद्र बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधुन एड्स जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रॅलीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सर्जेराव शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून उदघाटन केले.या रॅलीत महाविद्यालयातील ३२५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.जितेंद्र जैस्वाल,रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नामदेव गौंड,प्रा.मंगल माळवदकर,प्रा.डॉ.राजेश तगडपल्लेवार,डॉ.श्याम जाधव,डॉ.आर.डी.जाधव,डॉ.नागोराव आसोले ,प्रा.बबीता मानखेडकर,प्रा.सुरेखा खडके,प्रा.सुलभा गायकवाड,प्रा.स्वाती नागराळे,प्रा.ब्रम्हानंद पासामे,प्रा.शिवाजी खिराडे,ग्रामीण रूग्णालयाचे आयसीटीसी समुपदेशक रामदास पुंडकरे,लॅब टेक्निशियन संदीप तापडे यांच्यासह प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.