जो तारुण नेतो तो तरुण-सतीश हाणेगावे
गणेश मंडळात पत्रकार विनोद निला आणि उध्दव दुवे यांना तान्हूबाई बिर्जे उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित.

जो तारुण नेतो तो तरुण- सतिश हाणेगावे
मुख्य संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज मो.9766553995
केवळ सीमा आणि भूभाग म्हणजे राष्ट्र नव्हे तर विविधतेतून माणसासाठी एकता सिध्द करते ते राष्ट्र आणि सर्वांना सोबत घेऊन जागतिक पातळीवर ठसा उमटविते ती राष्ट्रीय एकात्मता असून या सर्वांना समर्पित कार्यातून सर्वोच्च शिखरापर्यंत तारुण नेतो तो तरुण असे प्रतिपादन जगदगूरु संत तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेश प्रवक्ते सतिश हाणेगावे यांनी आंबेवाडी (ता. चाकूर) येथे सोमवारी (ता.१) रोजी रात्री नवतरुण गणेश मंडळ आयोजित युवक व राष्ट्रीय एकात्मता या विषयावर व्याख्यानात बोलताना केले.
विनायक मोतीपवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला उद्घाटक माधव हलगरे तर प्रमुख पाहुणे म्हणून विश्वनाथ मोतीपवळे,बस्वराज निला उपस्थित होते.पुढे बोलताना ते म्हणाले की शिक्षण आणि प्रबोधनातून उभा राहिलेला तरुण मागे पडूच शकत नाही कारण या भारत भूमिला महात्मा गांधी पासून भगतसिंगापर्यत तरुणांनीच स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले आहे हा इतिहास आहे.आता मात्र त्याने प्रथम स्वतःच्या पायावर उभं राहून कुटुंब ते देशासाठी सज्ज होण्याची गरज आहे.
यावेळी पंचक्रोशीतील प्रेक्षकांनी हजेरी लावली होती.प्रास्ताविक गणेश गुणाले,सुत्रसंचलन पंडित कुमठे व धनराज बाचिफळे यांनी तर नवतरुण गणेश मंडळांच्या वतीने बस्वराज निला यांनी आभार मानले.यावेळी श्रोत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
मंडळाचा उपक्रम
मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी शुभम विरभद्र मोतीपवळे व गौरव गजानन मोतीपवळे,बालाजी युवराज मोतीपवळे(सीआरपीएफ जवान),अनुजा बालाजी गुणाले (सहाय्यक सरकारी वकील, बीड),गणेश रामलिंग मोतीपवळे (पोस्ट मास्तर),देवराव दयानंद मोतीपवळे (इस्रो), ग्रामरत्न अभियंता विश्वनाथ मोतीपवळे,महात्मा फुले आदर्श शिक्षक प्रदिप ढगे पत्रकार उध्दव दुवे व विनोद निला यांचा सहपरिवार तान्हूबाई बिर्जे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.