लालपरी साठी महिलांची विभागीय आगार नियंत्रकाकडे मागणी..!
भारताला स्वातंत्र्य मिळून ७९ पुर्ण झाले तरी अजूनही जगळपूर (खु) हे गांव लालपरीच्या प्रतीक्षेत.

जगळपूर (खु) बस सेवा सुरु करण्यासाठी एकल महिला संघटनेच्या वतीने लातुर विभागीय नियंत्रकांस निवेदन..!
मुख्य संपादक-सुनिल जाधव मो.9766553995
जगळपूर (खु) ते लातूर ही बस सेवा सुरु करण्यासाठी जगळपूर (खु) गावांतील महिला व एकल महिला संघटनेच्या वतीने राज्य परिवहन महामंडळ लातूर विभागाच्या नियंत्रकांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
जगळपूर (खु) ते लातूर येथे शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी व वयोवृद्ध नागरिकांना दळणवळणासाठी खूप मोठी अडचण येत असल्याने या गावातील महिलांनी पुढाकार घेऊन या जगळपूर (खु) गावातील विद्यार्थ्यांची व वयोवृद्धांची होत असलेली हेळसांड थांबावी म्हणून आमच्या गावांतूनही लालपरी सुरु व्हावी जगळपूर (खु) ते लातूर ही बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी एकल महिला संघटनेच्या चाकूर तालुका सचिव हजरतबी शेख जगळपूर (खु) गावच्या सरपंच स्वाती ठाकूर,गावच्या पोलीस पाटील स्वाती खलंग्रे,एकल महिला संघटनेच्या जगळपूरच्या प्रमुख करुणा शेटकर व गावांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.