लातुर जिल्ह्यात पूर परिस्थिती तर आज शाळेला सुट्टी जाहीर..!
चाकूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

लातुर जिल्ह्यात पूर परिस्थिती तर आज शाळेला सुट्टी जाहीर..!
चाकूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
मुख्य संपादक-सुनिल जाधव हो.9766553995
लातूर–दि.२९ जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ६० पैकी २९ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदवली गेली आहे.या पावसामुळे नदी,ओढ्यांची पाणी पातळी वाढून रस्ते,पुलावरुन पाणी वाहत असल्याने जवळपास ४९ रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे.आज २९ ऑगस्ट २०२५ रोजी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे,अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे.
सततच्या सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामध्ये शेळगाव महसूल मंडळातील बोथी,शिरनाळ,कलकोटी,राच्चनावाडी,सांडोळ, म्हांडोळ,या गावाजवळील साठवण तलाव व मोठे तलाव १००% भरुन वाहत आहेत तरी या गावातील काही शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी वाहून शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे तरी शासनाने तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून द्यावा अशी या गावातील शेतकऱ्यांची मागणी होत आहे.
चाकूर शहराला पाणीपुरवठा करणारे बोथी प्रकल्पातील लघु साठवण तलाव १००% भरल्याने बोथी व नवीन पुनर्वसन झालेल्या बोथी यांमध्ये जोडणाऱ्या पुलाच्या वरून पाणी जात असल्याने बोथी व नवीन पुनर्वशीत वसाहतीचा संपर्क तुटला आहे तरी बोथी गावचे सरपंच,तलाठी आणि ग्रामसेवक यांनी गावातील नागरिकांना आपापल्या घरी राहण्यास व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.