हंसनाळ येथील पूरग्रस्तांना चाकूर रोटरीच्या वतीने मदत..!
रोटरी क्लब चाकूर हे पूरग्रस्तांना करतात वेळोवेळी मदत.

रोटरी क्लब चाकूरच्या वतीने पुरग्रस्त हंसनाळ येथील नागरीकांना मदत..!
मुख्य संपादक-सुनिल जाधव मो.9766553995
चाकूर:रोटरी क्लब ऑफ चाकूरच्या वतीने ढगफुटी होऊन पुर आल्याने बाधीत झालेल्या हंसनाळ (ता.मुखेड जि.नांदेड) येथील नागरीकांना बुधवार दि.२० रोजी ब्लॅंकेट,टि-शर्ट व बिस्किटे वाटप करण्यात आली.
चाकूर रोटरी क्लबच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत पुरग्रस्त हंसनाळ(ता.मुखेड जि.नांदेड) येथील नागरीकांना ब्लॅकेट,टि-शर्ट व बिस्किटे वाटप करण्यात आली.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.केदार पाटील, सचिव धनंजय चिताडे,रो.सुभाष काटे,सुरेश हाके,शिवदर्शन स्वामी,दिलीप शेटे,सागर रेचवाडे,अमोल येरवे,वसंत भोसले,नागनाथ गंगापुरे,विनोद निला आदि उपस्थित होते.
यापुर्वीही रोटरी क्लब ऑफ चाकूरच्या वतीने सांगली जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पुरग्रस्त गावातील नागरीकांना नैसर्गिक आपत्तीत मदत करण्यात आली होती.