बोथीमध्ये सांस्कृतिक व धार्मिक नृत्यांचे विद्यार्थ्यांकडून सादरीकरण..!
जिल्हा परिषद व केशवराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग.

बोथीमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगवेगळ्या नृत्यांचे विद्यार्थ्यांकडून सादरीकरण..!
मुख्य संपादक-सुनिल जाधव मो.9766553995
चाकूर-स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज चाकूर तालुक्यातील बोथी गावांमध्ये विविध सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांनी उत्साहाचे वातावरण रंगले होते यामध्ये सकाळी जिल्हा परिषद शाळेमध्ये व केशवराव पाटील विद्यालयात आणि ग्रामपंचायत मधील ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी बोथीच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत,नृत्य,भाषणे आदींचे मनमोहक सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण मुलींच्या टिपऱ्या नृत्यकलेचे होते.तसेच केशवराव पाटील विद्यालयाच्या वतीने झालेल्या भाषण स्पर्धेत मुलींनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.
धार्मिक परंपरेचा सन्मान राखत गावातील भजनी मंडळाने संतांची गाथा अभंगांच्या माध्यमातून सादर केली.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात महिला भजनी मंडळींनी डोक्यावर कलश घेऊन दिंडीमध्ये सहभाग घेत, भक्ती व उत्साहाचे सुंदर दर्शन घडविले.
या सर्व उपक्रमांमुळे बोथी गावांमध्ये देशभक्ती, सांस्कृतिक जपणूक व संतपरंपरेचे मूल्य यांचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळाले.
यावेळी विद्यार्थ्यांचे पालक व गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.