शेळगाव येथील तिरु नदीपात्रात स्त्री जातीचा अनोळखी मृतदेह आढळला..!
खुन करुन पुरावे नष्ट करण्यासाठी नदीपात्रात प्रेत फेकल्याचा अंदाज-सपोनी सुनिल गायकवाड
शेळगाव येथील तिरु नदीपात्रात स्त्री जातीचा अनोळखी मृतदेह आढळला..!
मुख्य संपादक-सुनिल जाधव मो.9766553995
चाकूर:-तालुक्यातील शेळगाव येथील तिरु नदीच्या पुलाखाली अंदाजे वय १५ ते २५ वर्षे असलेल्या अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह राच्चनावाडीचे पोलीस पाटील गुणवंतराव बाबाराव पाटील यांनी दि.२४ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेताकडून घरी जाताना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी वाढवणा पोलीस स्टेशनला माहिती दिली त्यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता बिग वे कंपनीच्या मोरपंखी सुटकेसमध्ये खुन करुन पुरावे नष्ट करण्यासाठी शेळगाव फाटा ते चाकूर जाणाऱ्या तिरु नदीच्या पुलावरुन हे प्रेत खाली पाण्यात फेकून देण्यात आले असावे अशी माहिती वाढवणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांनी दिली.
या घटनेनंतर शेळगाव परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.जेणेकरुन शेळगाव हे गाव चाकूर आणि उदगीर या दोन तालूक्याच्या सीमेवरती असलेले गाव असून या गावांतून रात्रीला पोलीस स्टेशनकडून पेट्रोलींग करणारे वाहन फिरत नसल्याने अज्ञात आरोपीला खुन करुन पुरावे नष्ट करण्यासाठी हे ठिकाण मिळाले असेल असे येथील भयभीत झालेले नागरिकांचे म्हणणे आहे.
या अगोदर असाच एका मृत महिलेचा मृतदेह चाकूर तालुक्यातील हणमंतवाडीच्या वनविभागाच्या झाडीमध्ये आढळून आला होता आणि हा दुसरा स्त्री जातीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून या प्रेताची ओळख पटवणे तर पोलीसांपूढे आवाहन राहील.नेमके पोलीसांची भिती अशा आरोपी नराधमांना राहीली नाही का? असा प्रश्न या भागातील जनतेतून होताना दिसत आहे.
घटनास्थळी आलेल्या पत्रकाराला वाढवणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हालसे यांच्याकडून अरेरावीची भाषा करुन त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला व त्यातील या अनोळखी खुनाच्या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आलेले सर्व नष्ट करण्यात आले.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, आणि पोलीसांना पत्रकारांकडून सहकार्य होते याची हालसे उपनिरीक्षक यांना विसर पडली असावी असे वास्तव वेधचे तालुका प्रतिनिधी जगताप यांनी सांगितले.
शेळगाव येथील तिरु नदीपात्रातील स्री जातीचा खून केलेल्या अज्ञात आरोपींवर वाढवणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हालसे हे करीत आहेत.