संग्राम वाघमारे यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार जाहीर..!
सांगली येथे पुरस्काराने वाघमारे यांना सन्मानित करण्यात येणार.

पुढारीचे पत्रकार संग्राम वाघमारे यांना साहित्यरत्न जीवनगौरव पुरस्कार जाहीर..!
मुख्य संपादक-सुनिल जाधव मो.9766553995
चाकूर येथील पत्रकार संग्राम वाघमारे यांना ए.डी.फाऊंडेशन,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे.
संग्राम वाघमारे यांनी पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या विशेष उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून ए.डी फाऊंडेशनने एक आदर्श पत्रकार म्हणून त्यांची डॉ.आण्णाभाऊ साठे साहित्यरत्न जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केल्याचे ए.डी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक गोराड यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
हा पुरस्कार २३ ऑगस्ट रोजी हरिप्रिया मल्टीपर्पज हॉल,सांगली येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
वाघमारे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडवून उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांनी पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील विचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी २०१० पासून त्यांच्या जीवनावर स्मरणिका काढण्याचे मोठे कार्य केले आहे.ती स्मरणिका संपूर्ण महाराष्ट्रभर पोहचली आहे.अण्णाभाऊ साठे यांचे जीवनावर त्यांच्या लेखनाचा विविध वृत्तपत्राने प्रसिद्धी दिली आहे.साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल वाघमारे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.