चाकूरच्या पोलीस निरीक्षक पदी बालाजी भंडे..!
गोरगरीब जनतेस न्याय देण्यासाठी मी कटीबद्ध राहील.

चाकूरच्या जनतेस मी न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहील-बालाजी भंडे पोलीस निरीक्षक
चाकूर पोलीस स्टेशन येथे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकपदी बालाजी भंडे यांनी स्विकारला पदभार. बालाजी भंडे यांनी यापूर्वी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये चांगली कामगिरी केली आहे, गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणारे अधिकारी म्हणून बालाजी भंडे यांची ओळख आहे.
पोलीस निरीक्षक बालाजी भंडे हे एक शिस्तप्रिय मनमिळावू अधिकारी म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. चाकूर तालुक्यातील जनतेस पोलीस निरीक्षक भंडे हे कायदा व सुव्यवस्थेचा अधिक सक्षम अमलबजावणीला चालना मिळेल अशी तालुक्यातील जनतेला अपेक्षा वाटत आहे.
चाकूर तालुक्यातील सर्व जनतेस पोलीस निरीक्षक बालाजी भंडे हे जनतेच्या समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी मी कटिबद्ध राहीन असे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी चाकूर पोलीस स्टेशनचा पदभार घेताना पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. तालुक्यातील गोरगरीब जनतेला बालाजी बंडे पोलीस अधिकारी कसे न्याय देतील याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.