रोटरी क्लब चाकूरच्या वतीने दंत चिकित्सा,नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न..!
कैलास टेकडी व हकानी बाबा यात्रेनिमित्त रोटरी क्लबने राबविला उपक्रम.

रोटरी क्लब चाकूरच्या वतीने दंत चिकित्सा,नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न..!
चाकूर-हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या कैलास टेकडी व हाकानी बाबा यात्रेनिमित्त रोटरी क्लबच्या वतीने दंत चिकित्सा,नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन फित कापून उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी,रोटरीचे उपप्रांतपाल चंद्रशेखर मुळे, अध्यक्ष डॉ.केदार पाटील,सचिव धनंजय चिताडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विवेक होळे,वैद्यकीय अधीक्षक डॉ.जितेन जैस्वाल,पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, प्रोजेक्ट चेअरमन सुरेश हाके,प्रोजेक्ट चेअरमन उमरैन पटेल यांच्यासह महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च,लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व श्रीमती सरस्वती कराड ब्लड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. मरणोत्तर देहदानाचा संकल्प व रक्तदान केल्यामुळे विकास हाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ.चंद्रप्रकाश नागिमे,डॉ.संजय स्वामी, डॉ.एन.जी.मिर्झा,सागर रेचवाडे,दिलीप शेटे,नारायण बेजगमवार,विकास हाळे, संगमेश्वर जनगावे,सुधाकर हेमनर,शिवदर्शन स्वामी,अमोल येरवे,चंद्रशेखर मिरजकर, धनंजय कोरे,वसंत भोसले,नागनाथ गंगापुरे, संभाजी पाटील यांच्यासह रोटरी क्लब ऑफ चाकूरच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष काटे यांनी केले.सूत्रसंचालन शैलेश पाटील तर आभार धनंजय चिताडे यांनी मानले.
चाकूर रोटरी क्लबचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांनी केलेले कार्य समाजोपयोगी असून त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे.गरजू लोकांपर्यंत रोटरी पोहचलेली आहे,असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांनी उद्घाटन प्रसंगी केले.यावेळी पोलीस निरीक्षक बालाजी भंडे,वैद्यकीय अधिक्षक डॉ.जितेन जैस्वाल आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.