स्वामी विवेकानंद विद्यालय चापोलीचे सहशिक्षक सुशिल वाघमारे राज्यस्तरीय शिक्षकांच्या निबंध स्पर्धेत राज्यातून प्रथम..!
आदर्श शिक्षक पुरस्काराने सुशिल वाघमारे हे सन्मानित.

राज्यस्तरीय शिक्षकांच्या निबंध स्पर्धेत सुशिल वाघमारे राज्यातून प्रथम..!
स्वामी विवेकानंद विद्यालय चापोलीचे सहशिक्षक सुशिल वाघमारे हे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.
चाकूर : शंभर शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या निबंध स्पर्धेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये राज्यभरातून असंख्य शिक्षक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.यात राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान चाकूर तालुक्यातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर चापोलीचे सहशिक्षक सुशिल रंगनाथ वाघमारे यांनी मिळविला आहे.
बक्षीस वितरण सोहळा जेईएस महाविद्यालय जालना येथे पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य तथा साहित्यिक एम.जी.जोशी होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.गणेश अग्निहोत्री , कवयित्री भारती हेरकर,प्राचार्य डॉ.अशोकराव खरात,आर आर जोशी,प्रा यशवंत सोनवणे, जगदीश खुडे मुख्य संयोजक राजेभाऊ मगर, मंदाकिनी खालसे,संदीप इंगोले,साजिद खान पठाण,यांच्याहस्ते राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त शिक्षक सुशिल रंगनाथ वाघमारे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी राज्यभरातील विभागनिहाय, जिल्हानिहाय प्रथम,द्वितीय आणि तृतीय अशा १७७ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.या स्पर्धेचे १३ परीक्षकांनी परीक्षण केले होते.राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांक व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल सुशिल वाघमारे यांचे रामगिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबुराव शिंदे, मुख्याध्यापक तथा संचालक व्यंकटेश शिंदे,प्रा मु.अ.माधव होनराव,अशोक कोतपोलू,निलेश कांबळे सह सामाजिक,राजकीय,शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील मित्रपरिवारांकडून अभिनंदन केले जात आहे.