चाकूरच्या वैभव हाळे यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..!
हाळे कुटुंबाकडून राबविला जातो हा दरवर्षी उपक्रम.

मुख्य संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज मो.9766553995
वैभव हाळे यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप.
चाकूर : वैभव हाळे यांच्या चौथ्या पुण्यतिथी निमित्ताने चाकूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर जिल्हा परिषद मुलींची शाळा व जिल्हा परिषद मुलांच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.वैभव हाळे यांच्या स्मरणार्थ गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर वैभव हाळे यांच्या मातोश्री श्रीदेवी हाळे,वडील विकास हाळे,बहीण तेजस्विनी कानडे,भाऊजी गजानन कानडे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुनंदा हिप्पाळे, डॉ.अंजली स्वामी,सुषमा सोनटक्के,फुलारी मॅडम,रोटरीचे उपप्रांतपाल चंद्रशेखर मुळे, रोटरी क्लब ऑफ चाकूरचे अध्यक्ष डॉ.केदार पाटील,सचिव धनंजय चिताडे,प्रोजेक्ट चेअरमन विकास हाळे,सुभाष काटे,संगमेश्वर जनगावे,शैलेश पाटील,सुरेश हाके,सागर रेचवाडे,दिलीप शेटे,मुज्जूभाई शेख,अमोल येरवे,वसंत भोसले,नागनाथ गंगापुरे यांच्यासह ईनरव्हील क्लब व रोटरी क्लब ऑफ चाकूरचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ईनरव्हील क्लब ऑफ चाकूर च्या वतीने जिल्हा परिषद मुलींच्या शाळेला शाळेचे नाव असलेला बोर्ड भेट देण्यात आला. रोटरी अध्यक्ष डॉ.केदार पाटील यांच्या हस्ते कुपनलिकेचे पूजन करण्यात आले. आई-वडिल हेच दैवत समजून त्यांचे दर्शन घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. रोटरीयन अरविंद तोंडारे यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सुभाष काटे यांनी रोटरी व इनरव्हील क्लबच्या वतीने करण्यात येणाऱ्या सामाजिक कार्याची माहिती सांगितली.यावेळी मुख्याध्यापक,शिक्षक वृंद, शिक्षण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.