पंचायत समितीचे सहाय्यक लेखाधिकारी संजय भाले यांना सेवापुर्ती निरोप..!
संजय भाले हे सलग २९ वर्षे सेवेनंतर सेवानिवृत्त.

सहाय्यक लेखाधिकारी संजय भाले यांचा सेवानिवृत्ती निरोप..!
मुख्य संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज मो.9766553995
चाकूर येथील पंचायत समितीचे सहाय्यक लेखाधिकारी संजय भाले सलग २९ वर्षे प्रदीर्घ सेवेनंतर ३० ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा पंचायत समितीच्या वतीने सहपत्नीक सत्कार करुन निरोप देण्यात आला.
पंचायत समितीच्या सभागृहात सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी मंदोदरी वाकडे,विस्तार अधिकारी तुकाराम उपरवाड,संजय भाले,मिना दैवज्ञा भाले हे उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील सरपंच,ग्रामसेवक ग्रामरोजगार संघटना,पेन्शनर संघटना व पत्रकार यांच्या वतीने भाले यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी गटविकास अधिकारी वंगवाडे,तुकाराम उपरवाड,प्रा.अ.ना.शिंदे, मिना भाले,माजी सरपंच मधुकर मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या तर संजय भाले यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार व्यक्त केले.संजय भाले यांनी या नौकरीच्या कालावधीत लातुर जिल्हा परिषदेतील अर्थ विभाग,समाजकल्याण विभाग,आरोग्य विभागाबरोबरच चाकूर येथील पंचायत समितीत सहाय्यक लेखाधिकारी म्हणून २९ वर्षे सेवा बजावली आहे.त्यांचा मुलगा निखिल हा सॉफ्टवेअर इंजिनियर तर मुलगी निकीता या आयडीबीआय बँकेत शाखाधिकारी आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विस्तार अधिकारी महेश माने यांनी केले.तर आभार कनिष्ठ लेखाधिकारी मणीयार यांनी मानले.यावेळी तालुक्यातील सरपंच,ग्रामसेवक पंचायत समितीतील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.