कृषी महाविद्यालय लातूर यांच्यामार्फत ब्रम्हवाडी येथे शेतकऱ्यांना गोवंश जतन व संवर्धन मेळावा संपन्न..!
पशुधनात गुणात्मक आणि संख्यात्मक वृद्धी आवश्यक- डॉ.बाबासाहेब ठोंबरे

कृषी महाविद्यालय लातूर यांचे ब्रम्हवाडी येथे देशी गोवंश जतन व संवर्धन मेळावा संपन्न..!
पशुधनात गुणात्मक आणि संख्यात्मक वृद्धी आवश्यक- डॉ.बाबासाहेब ठोंबरे
चाकूर तालुक्यातील ब्रम्हवाडी येथे कृषी महाविद्यालय,लातूर अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण जागरुकता कार्यानूभव व कृषी औद्योगिक संलग्नता कार्यक्रमांतर्गत देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताहाच्या निमित्ताने आज शेतकरी व पशूपालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा व पशूपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अधिकारी डॉ.विजय भामरे,मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.संदीप देशमुख, पशुधन विकास अधिकारी डॉ.सुनिल साळी, डॉ.श्रीमंत बनसोडे,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक देविदास चाटे,गावचे ज्येष्ठ पशुपालक बाबाराव सलगर आणि बसवंत कांबळे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात डॉ.ठोंबरे म्हणाले,”शुद्ध पैदास,समतोल आहार,काटेकोर व्यवस्थापन आणि चांगले आरोग्य हे पशूधनाच्या गुणवत्तेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.”त्यावेळी बोलताना ते सांगितले की,लातुर जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त व पठारी भूगोल लक्षात घेता जनावरांचे लसीकरण अत्यावश्यक आहे.दुग्धव्यवसाय,शेळी-मेंढीपालन आणि कुकूटपालन हे ग्रामीण भागातील आर्थिक आधार असून,संसर्गजन्य रोगांमुळे उत्पादनावर व आर्थिक स्थैर्यावर परिणाम होतो.
लाळ्या खुरकूत,फऱ्या,घटसर्प व लम्पी स्किन या रोगांचा प्रतिबंध लसीकरणाद्वारे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.”शुद्ध गोवंश विकत मिळत नाही,तो पाळला जातो” या उक्तीचा संदर्भ देत लसीकरण मोहीम ही पावसाळ्यात विशेषतः आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यामध्ये डॉ.संदीप देशमुख यांनी नैसर्गिक शेतीसाठी पशुधनाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले तर डॉ.सुनिल साळी यांनी पशुधनातील संसर्गजन्य आजार व त्यांचे व्यवस्थापन यावर माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विजय भामरे यांनी केले तर सूत्रसंचालन कृषीदूत सचिन यादव यांनी केले, तर आभार निर्भय त्रिपाठी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस.एम. पठाण,चंद्रकांत स्वामी,तसेच कृषी महाविद्यालय लातूरचे कृषीदूत व कृषीकन्या यांनी विशेष परिश्रम घेतले.