ग्रामीण रुग्णालयातील वेळेवर होत नाही साफसफाई..!
रुग्णालयातील सेवकांना कोणाचा आशिर्वाद? असा रुग्णांतून उपस्थित होतो सवाल.

ग्रामीण रुग्णालयातील वेळेवर होत नाही साफसफाई,रुग्णांची होते हेळसांड..!
चाकूरच्या ग्रामीण रुग्णालातील प्रकार
चाकूर:-येथील ग्रामीण रुग्णालयातील वेळेवर साफसफाई होत नसल्याने रुग्णांची हेळसांड होतानाचे चित्र दिसून आले.ग्रामीण रुग्णालयातील पुरुष वार्डामध्ये साफसफाई केलेली दिसून येत नाही एक तर हा महाराष्ट्र शासनाचा गोर गरीब जनतेच्या सेवेसाठी हा ग्रामीण रुग्णालय चालवला जातो.शासन या रुग्णालयामार्फत आपल्या तिजोरीतील खूप मोठा निधी खर्च केला जातो.
येथील कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळतो परंतू या ग्रामीण रुग्णालयामध्ये साफसफाई होत नाही असे या रुग्णालयातील दाखल असलेली रुग्णांनी माहिती दिली.पुरुष वार्डामध्ये रुग्णांनी खालेली बिस्कीटाचा कचरा व बेडवर रिकाम्या पाण्याच्या बाटल्या तर रुग्णांना लावलेल्या स्लाईनच्या बाटल्या संपलेल्या डस्ट बीन असलेल्या डब्यात न टाकता बेडच्या खाली पडलेल्या अवस्थेत दिसून आले.या रुग्णालयात कर्मचारी हे कामाला असून नसल्यासारखे चित्र दिसत आहे.वैद्यकीय अधीकारी यांना याबद्दल भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी लवकर सेवकांची भरती होईल अशी माहिती दिली.
चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सेवकांची संख्या कमी आहे यामध्ये अभिषेक पवार हा सेवक आजारी असल्यामुळे साफसफाई साठी दिरंगाई झाली असेल आणि येत्या काही दिवसांमध्ये तीन नवीन सेवकांची पदे आपल्या रुग्णालयाला मिळणार आहेत.
डॉ.नितीन जैस्वाल वैद्यकीय अधीक्षक
ग्रामीण रुग्णालय चाकूर.