महापुरुषांचे अवमान केल्याप्रकरणी भुमिअभीलेख कार्यालयातील विनायक राठोड या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल..!
चाकूरच्या भूमिअभिलेख कार्यालयातील प्रकार.

महापुरुषांचे अवमान केल्याप्रकरणी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल..!
चाकूरच्या भूमिअभिलेख कार्यालयातील प्रकार
चाकूर येथील भुमिअभिलेख कार्यालयात साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचा अवमान केल्याप्रकरणी एका कर्मचाऱ्यावर चाकूर पोलिसांत शुक्रवारी ४ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी,येथील भूमिअभिलेख कार्यालयात डॉ.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना झालेल्या खिडकीला लागूनच भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी विनायक टिकाराम राठोड यांचा टेबल असून त्यांच्याच भूमिअभिलेख कार्यालयातील दक्षिणेकडील खिडकीला १९ जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजता साहित्यरत्न डॉ.आण्णाभाऊ साठे यांचा फोटो उलटा टांगून,सुतळीच्या दोरीने बांधून विटंबना केलेली आहे.कर्मचारी विनायक टिकाराम राठोड यांनी ऑफीसमधील टेबल जवळच्या खिडकीला डॉ.आण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा उलटी दोरीने बांधून विटबंना करुन सर्व मातंग समाजाच्या धार्मिक श्रध्दांचा अपमान करुन ते अपवित्र केले आहे.
त्याप्रकरणी नितीन रावसाहेब डांगे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन कर्मचारी विनायक टिकाराम राठोड यांच्याविरुद्ध चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर.टी चव्हाण हे करीत आहेत.
चौकट :-
या प्रकरणात भूमिअभिलेख कार्यालयाच्या उपधीक्षक गवई यांनी कार्यालयातील प्रभारी मुख्यालय सहाय्यक,भुमापक आणि शिपाई यांच्यावर कारणे दाखवा नोटीस आणि दोषी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी यापूर्वी वरिष्ठांना २५ जून रोजी पत्राद्वारे प्रस्तावित केले आहे.