चाकूरमध्ये उभारणार शेतकरी भवन-सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील
१ कोटी ५२ लक्ष ६९ हजार रुपयाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी.

सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने चाकूरात उभारणार शेतकरी भवन..
१ कोटी ५२ लक्ष ६९ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता..
मुख्य संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज मो.9766553995
चाकूर – राज्याचे सहकार मंत्री तथा चाकूर – अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आ.ना.बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने चाकूर येथे शेतकऱ्यांसाठी नवीन शेतकरी भवन उभारण्यात येणार असून शेतकरी भवन हे चाकूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे उभारणार आहे या शेतकरी भवनाच्या बांधकामासाठी १ कोटी ५२ लक्ष ६९ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता शासनाने प्रदान केली असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की ना.बाबासाहेब पाटील एक स्वतः शेतकरी असल्याकारणाने शेतकऱ्यांच्या व्यथा व वेदना त्यांना माहित आहेत.तालुक्याच्या ठिकाणी शेतकरी विविध कामानिमित्त येतात,कृषी उत्पन्न बाजार समितीत सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी येत असतात.त्यांना या ठिकाणी थांबण्यासाठी कुठलीही एक महत्त्वाचे ठिकाण नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.या गोष्टीची दखल घेत राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या पुढाकारातून चाकूर येथे नव्याने कृषी उत्पन्न बाजार समिती चाकूर येथे शेतकरी भवनासाठी प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली असून सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण करून लवकरच या शेतकरी भवनाचे काम सुरू होईल अशी माहिती राज्याची सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.
या शेतकरी भवनामुळे चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आधार मिळणार आहे. त्यामुळे चाकूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आनंदी आहेत.तालुक्यातील शेतकऱ्यांनी ना.बाबासाहेब पाटील यांचे शेतकरी भवनाच्या उभारणी बद्दल आभार मानले आहेत.