बंजारा समाजाच्या वतीने वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेस जयंतीनिमित्त अभिवादन..!
सर्व जाती-धर्मातील समाज नाईक साहेबाला अभिवादन करण्यासाठी एकवटला.

चाकूर येथे बंजारा समाजाच्या वतीने वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेस जयंतीनिमित्त अभिवादन..!
मुख्य संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज मो.9766553995
चाकूर:-महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आणि सर्वात जास्त काळ सलग ११ वर्षे ०२ महिने १८ दिवस मुख्यमंत्री पद भूषविणारे महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत दोन वर्षात स्वयंपूर्ण नाही झाल्यास मी फासावर जाईन अशी शपथ घेणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतरावजी नाईक साहेब यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त आज चाकूर तालुक्यातील बंजारा समाजाच्या वतीने पोलीस स्टेशन रोड व बोथी रोड येथील वसंतरावजी नाईक चौकामध्ये नाईक साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून श्रीफळ फोडून अभिवादन करण्यात आले.
हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतरावजी नाईक साहेब यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी प्रत्येक समाजातील समाज बांधव एकवटला होता,भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाचे प्रा.डॉ.बी.डी पवार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून श्रीफळ फोडण्यात आले,यामध्ये प्रा.डॉ.बी.डी पवार,पत्रकार सुनिल जाधव,ॲड.परशुराम राठोड,व्ही.एस पॅंथरचे जिल्हाध्यक्ष शरद किनीकर यांनी वसंतरावजी नाईक साहेबांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी चाकूर तालुक्यातील बंजारा समाजातील तानाजी जाधव,ॲड.परशुराम राठोड,सुनिल राठोड,बालाजी जाधव,नितीन जाधव,शत्रुघ्न जाधव,आकाश राठोड, रामराव जाधव,लक्ष्मण पवार,राम जाधव,वैभव राठोड,आकाश राठोड,करण राठोड,अर्जुन राठोड,राजू राठोड,श्रीकांत राठोड,अर्जुन शेषेराव राठोड,किरण पवार,ईश्वर जाधव,आकाश उद्धव राठोड,दिपक राठोड,भानुदास जाधव,अमोल राठोड सूत्रसंचलन संतोष जाधव तर आभार प्रदर्शन परशुराम राठोड यांनी केले.