विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या मुखेडच्या भाविकांचा चाकूरजवळ अपघात..!
अपघातात दोघाची प्रकृती गंभीर.

मुख्य संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज मो.9766553995
पंढरपूरच्या दर्शनाला जाणाऱ्या मुखेडच्या भाविकांचा चाकूरजवळ अपघात..!
लातूर-नांदेड महामार्गावर आज दि.२९ रोजी दुपारी ०२ वाजण्याच्या सुमारास अलगरवाडी पाटी चारलिंब जवळ पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त देवदर्शनासाठी निघालेल्या पाच भाविक अपघातात जखमी झाले आहेत.
लातुरहून-अहमदपूर कडे भरधाव वेगात जाणाऱ्या कार चालकाचा वेगावरील नियंत्रण सुटला आणि कार (क्रं.एम.एच-०२ बी झेड-५४२५) रस्त्यामधील दुभाजकावरुन विरुध्द दिशेने येणाऱ्या एर्टिका कार (क्रं.एम.एच-२६ सी पी-६१४४) या कारवर जाऊन आपटली.या अपघातामध्ये पंढरपूरला जाणारे महेश कुदळे (वय वर्षे २६),राजू सुरेश रणभीरकर(वय वर्षे ४३),सुनिल सुरेश रणभीरकर (वय वर्षे ४१),रत्नाकर गंगाधर कळसकर (वय वर्षे ४३)आणि माधव इबीतवाड (वय वर्षे ५६),हे सर्व भाविक रा.मुखेड जि.नांदेड येथील रहिवासी असून हे गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातानंतर दोघांना उपचारासाठी दवाखान्यात हलवीण्यात आले असून या अपघाताचे चाकूर पोलीसांकडून चौकशी करण्यात येत आहे.