मतदारसंघातील रस्त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही- ना.बाबासाहेब पाटील
मुख्य संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज मो.9766553995

मतदारसंघातील रस्त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही- ना.बाबासाहेब पाटील
चाकूर -मतदारसंघातील रस्त्यासाठी भरीव निधी देणार असून मतदार संघातील रस्त्यांमुळे दळणवळणाला चालना मिळणार आहे. रोजगाराच्या संधी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. तसेच सर्वसामान्य नागरिकांना सहकाराशी जोडणार असून सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवण्याचं काम सहकार खात्याच्या माध्यमातून मला करायचे आहे असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांनी शेळगाव व नळेगाव येथे आयोजित कार्यक्रमात केले.
केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ना.बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने शेळगाव ते डोंग्रज येथे २५ कोटी रुपये व नळेगाव येथे २५ कोटी अशा एकूण ५० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनाच्या समारंभ प्रसंगी ना. पाटील बोलत होते.शेळगाव येथे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे होते तर नळेगाव येथे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सूर्यकांत चव्हाण होते.
यावेळी व्यासपीठावर रमाकांत चवळे, उत्तमराव पाटील,निर्मलाताई वाडकर, पद्माकरराव पाटील,करीम गुळवे,मिलिंदराव महालिंगे,गंगाधरप्पा अक्कानावरू,यशवंतराव जाधव,सुदर्शन मुंडे,बालाजी सूर्यवंशी,राहुल सुरवसे,भानुदास पोटे,मुजमिल सय्यद, इलियास सय्यद,मुरतुजा सय्यद,शिवदर्शन स्वामी,राम कसबे,गणपत नितळे,गणपत कवठे,विष्णू तीकटे,लक्ष्मण घुमे,व्यंकट केलवाड,विश्वनाथ एडके,शिवशंकर हाळे, मेघराज पाटील,समाधान डोंगरे,राजाराम महात्मे,सूर्यकांत केंद्रे,प्रकाश बंडे,गणपतराव मुंडे,सुभाष चापुले,बाळासाहेब पाटील,मारुती माडगे,ओम केंद्रे,संदीप शेटे,विश्वनाथ घटकार, बिलाल पठाण,राजकुमार वागलगावे,राजाराम चिंचोळे,गणेश पाटील,प्रफुल्ल चवळे,सचिन बदनाळे,संगमेश्वर वाडकर,सतीश पाटील, योगेश वाडकर,शरद पाटील,सिद्धेश्वर आप्पा अंकलकोटे,मधुकर मुंडे, सचिन तोरे,शेषेराव मुंजाने,भानुदास पोटे,बी.एम बिराजदार, पदमीनबाई खांडेकर,हनुमंतराव लवटे पाटील, सावता माळी,खुदबुद्दीन घोरवाडे, सूर्यकांत सावंत, सोपानराव मनाळे, मार्शल माने, श्रीराम गायकवाड,नामदेव शिंगडे , शंकरराव पाटील, विश्वनाथ एडके, व्यंकटराव पाटील,सुरेंद्र सावंत, सर्फराज घोरवाडे, इर्शाद मुजावर, गणेश शिंदाळकर, उमाकांत सावंत, आली मुनबी मजकुरी, अशपाक मुजावर, रवी शिरुरे, जनाबाई सुरवसे, नागनाथ भालेकर,सतीश पांडे,मुजमिल पटवेकर, कलुबाई तोंडारे, धोंडीराम रामपुरे, संजिदाबी कोतवाल, श्याम मुंजाने, रामकृष्ण शिरूरे, पंडित मोरकांडे, भिमाजी धामणगावकर, कावेरी गाडेकर, जनाबाई शिरूरे, रामेश्वर बिराजदार, नरसिंग पाटील,गोपाळकृष्ण मोकाशे, तानाजी शिंदाळकर,चंद्रकांत शेलार, बळवंतराव पाटील सह आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना नामदार पाटील म्हणाले की,आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिल्यामुळे मला विधानसभेत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली,त्याचबरोबर मराठवाडा व विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अजितदादांनी मला सहकार मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली.सहकार विभागात ३० कोटी पेक्षा अधिक लोक काम करतात.राज्यातल्या सोसायटींना भरीव निधी देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याची माझे उद्दिष्ट आहे.सौर ऊर्जेसाठी शासन भरिव निधी देत असून आपण सर्वांनी सौर ऊर्जा प्रकल्प बसून घ्यावा असे आवाहनही नामदार पाटील यांनी केले.
शेतकऱ्यांनी विषमुक्त शेती करावी.चाकूर तालुक्यात भविष्यात दूध प्रकल्प सुरू करून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न स्त्रोत निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे.चाकूर तालुक्यातले उर्वरित विकास कामेला गती देऊन लवकरच सर्व विकास कामे पूर्णत्वाकडे नेणार आहे. असे नामदार पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उदगीर सौ.अल्का डाके यांनी केले .कार्यक्रमाची सूत्रसंचालन गणेश स्वामी व बिलाल पठाण यांनी केले.