आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय स्टेट बँकेच्या ७० वा वर्धापन दिनानिमित्त चाकूर शाखेत रक्तदान शिबिराचे आयोजन,५४ रक्तदात्यांनी केले रक्तदान..!

मुख्य संपादक:- सुनिल जाधव सेवा न्यूज मो.9766553995

भारतीय स्टेट बँकेच्या ७० वा वर्धापन दिनानिमित्त चाकूर शाखेत रक्तदान शिबिराचे आयोजन,५४ रक्तदात्यांनी केले रक्तदान..!

चाकूर-भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त चाकूर शाखेत दिनांक २१ जून २०२५ रोजी रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले.त्यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर यांनी ७१ वे रक्तदान केले तसेच या उपक्रमात एकूण ५४ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करुन सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घडवीले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सहाय्यक पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे मुख्य प्रबंधक विकास रंजन हे होते.

या प्रसंगी मुख्य प्रबंधक ब्रिजेश श्रीवास्तव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर,रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.संजय स्वामी,सचिव सुरेश हाके,माजी अध्यक्ष चंद्रशेखर मुळे,डॉ.राहुल पाटील,मेघराज बाहेती यांची प्रमुख उपस्थिती होती,तर बँकेची शाखाधिकारी अजय गटानी,त्यांच्यासह अनिल अहिरे,केदार देशमुख,गोपाळ पाटील,सागर बांबोडे,संदिपान पांचाळ,कराड,सोहेल,तेजस गव्हाळकर,मलानबी शेख,इतर कर्मचारी व बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बचत गटाच्या माध्यमातून एस एस जी अंतर्गत तालुक्यातील बचत गटांना सीआरपीच्या माध्यमातून ३१ मार्चपर्यंत ज्या सीआरपी ने दहा लाखापेक्षा जास्त लोन वाटप केली आहे, अशा सात सीआरपींना बँकेकडून मानाची पैठणी देण्यात आले.त्यावेळी आशा बाबने, अश्विनी जाधव,गीता जोशी,जान्हवी प्रसाद, अनुजा पटणे,सुरेखा तिकटे,नंदा जीवलगे यांचा समावेश होता व उमेद केडर संघटना तालुकाध्यक्ष आम्रपाली तिगोटे,अयोध्या भोपळे,आदिमाया खोडेवाड,सुनिता जागीरदार, लता नरवटे या उपस्थित होत्या.

शिबिराचे यशस्वी आयोजन हे बँकेच्या कर्मचाऱ्यांचे आणि रोटरी क्लबच्या सदस्य व स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्र चालक व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांच्या सहकार्याने शक्य झाले असे बँकेचे शाखाधिकारी अजय गटानी म्हणाले.उपस्थित मान्यवरांनी बँकेच्या या उपक्रमाचे कौतुक करत,भविष्यातही असे उपक्रम राबवावेत असे आवाहन केले.

या उपक्रमामुळे सामाजिक जबाबदारी आणि जनतेशी असलेली नाळ बँकेने अधोरेखित केली आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक सेवा न्यूज

मुख्य संपादक-सुनिल‌‌‌ जाधव सेवा न्यूज मो.9766553995

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.