महापुरुषांचे अवमान प्रकरणी चाकूरच्या कार्यकर्त्यांचा तहसील कार्यालयात कारवाईसाठी ठिय्या..!
न्याय मिळत नसल्याने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे धाव.

मुख्य संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज मो.9766553995
महापुरुषाचे अवमान प्रकरणी चाकूरच्या कार्यकर्त्यांचा तहसील कार्यालयात कारवाईसाठी ठिय्या.
चाकूर-सेवा न्यूज
येथील भुमिअभिलेख कार्यालयात डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचा अवमान केल्याप्रकरणी अद्याप संबंधितावर कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही,ती लवकर करावी या मागणीसाठी सोमवारी दुपारी तहसीलदार यांच्या दालनात मातंग समाज बांधवानी ठिय्या मांडला.
दरम्यान मातंग समाज बांधवानी पोलीस निरीक्षकांना निवेदन देवून यातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे.यावेळी पोलीस निरीक्षकांकडून चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे सांगितले गेले मात्र अद्याप पोलीसांकडूनही चौकशी आणि कारवाई केली नसल्यामुळे मातंग समाज बांधवानी मंगळवारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देवून या प्रकरणातील दोषी संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा चाकूर तालुक्यातील मातंग समाजाच्या भावनेचा उद्रेक होईल असे त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यादरम्यान तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख यांना पत्र देवून झाल्या प्रकरणी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावे असे पत्राद्वारे कळविले आहे.यावेळी सुनिल सौदागर,अविनाश कवडे,रामेश्वर कसबे,नितीन डांगे,कोमेश कसबे,पपन वैरागे,संगमेश्वर कसबे आदीजण उपस्थित होते.
पोलीस उपविभागीय अधिकाऱ्याकडे घेतली धाव
या प्रकरणात दिवसेंदिवस उशीर होत असून संबंधितावर कसलीच कारवाई झाली नसल्यामूळे मातंग समाज कार्यकर्त्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी यांना मंगळवारी निवेदन देवून भूमी अभिलेख कार्यालयातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल कारण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.