सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आज ५० कोटी रस्त्याच्या कामाचे होणार भूमिपूजन..!
चाकूर तालुक्यातील शेळगाव फाटा व नळेगाव येथे होणार भूमिपूजन सोहळा.

सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आज ५० कोटी रस्त्याच्या कामाचे होणार भूमिपूजन..!
चाकूर – राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून केंद्रीय मार्ग निधी या योजनेअंतर्गत ५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.यामध्ये हाळी ते डोंग्रज १० किलोमीटरच्या रस्त्यासाठी २५ कोटी रुपयांच्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा सोमवार दिनांक २३ जून रोजी म्हणजे आज सकाळी ठीक १० वाजता शेळगाव फाटा येथे तसेच घरणी ते नळेगाव व हुडगेवाडी या १० किलोमीटर रस्त्याचा २५ कोटी रुपयाच्या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते व नळेगाव येथे सकाळी ११:३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नळेगावचे सरपंच सुर्यकांत चव्हाण असणार आहेत.
या कार्यक्रमासाठी तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित राहणार असून या भूमिपूजन कार्यक्रमासाठी चाकूर तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.