आपला जिल्हाताज्या घडामोडी

डॉ.मधुसूदन बांगड केंद्रावर दहावीच्या परीक्षा सुरळीत

अजनसोंडा (बु) परिक्षा केंद्रावरील परिक्षा पारदर्शकपणे व सुरळीत

संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995

डॉ.मधुसूदन बांगड केंद्रावर दहावीच्या परीक्षा सुरळीतपणे…. 

चाकूर तालुक्यातील अजनसोंडा (बु) येथील डॉ.मधुसूदन बांगड विद्यालयात खूप मोठ्या प्रमाणात कॉपी चालू आहे अशी चर्चा चाकूर तालुक्यात पसरलेली असताना या परीक्षा केंद्राची पाहणी केली असता येथे दहावीच्या परीक्षा सुरळीतपणे चालू आहेत यामध्ये दिनांक ७ मार्च रोजी इंग्रजी या विषयाचा पेपर होता.

या परीक्षा केंद्रावर एकूण २१९ विद्यार्थी परीक्षा देत आहेत,यामध्ये इंग्रजीच्या पेपरसाठी २१५ विद्यार्थी उपस्थित होते आणि इंग्रजीचा पेपर असल्याने ४ विद्यार्थ्यांनी या विषयाकडे पाठ फिरवली आहे.या परिक्षा केंद्रावरील  विद्यार्थ्यांमध्ये ४ विद्यार्थी हे दिव्यांग आढळून आले,त्यांची बांगड विद्यालयातील सेवकांनी उठा ठेव करण्याची काळजी घेत आहेत.

परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक केंद्रे डी.व्ही मुंजेवार वाय.पी लिपिक आणि या परीक्षा केंद्रावर बैठे पथक म्हणून चिमंदरे आर.के विषयतज्ञ आणि महसूल विभागाचे कर्मचारी सुडके एम.पी तलाठी,साबदे जे.ए ग्रामसेवक हे उपस्थित होते तर हो.के.पी यसमोडे,बी.डी यसमोडे यांनी या परिक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला होता.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.