आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि संविधान वाचविण्यासाठीची ही निवडणूक.-आ.धीरज देशमुख

संविधान वाचविण्यासाठी व लोकशाही बळकटीसाठी मतदान करणे गरजेचे

संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि संविधान वाचविण्यासाठीची ही निवडणूक.आ.धीरज देशमुख

चाकूर तालुक्यातील जानवळ येथे लातुर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांच्या प्रचारसभेत दि. २५ रोजी जानवळ येथे आमदार धीरज देशमुख यांनी सांगितले की,भारताची लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी,हूकुमशाहीला विरोध करणारी ही निवडणुक असुन,खोटं आश्वासन देणार्या भाजपाला जनता जाब विचारणारी ही निवडणूक असून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.शिवाजी बंडाप्पा काळगे यांना मतदार बहूमतांनी विजयी करणार असल्याचा विश्वास जानवळ येथील जाहीर सभेत आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला आहे.पुढे बोलताना देशमुख म्हणाले की,प्रत्येक भारतीयांना पंधरा लाखाचं दिलेल्या स्वप्नाचे काय झालं,शेतीमालाच्या पडत्या भावाचं काय,वाढ़ती महागाई,वाढती बेरोजगारी,गॅस पेट्रोलच्या गगनाला भिडलेल्या किंमती याचा जाब जनता मतदानाच्या माध्यमातून विचारणार आहे आणि केंद्र सरकार फक्त उद्योग पतीचे आहे.सर्वसामान्य जनतेच्या मुलभुत गरजा काय आहेत.याकडे सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे सांगितले.

शेवटी आमदार देशमुख म्हणाले की,केंद्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पाच वर्षाचे गॅरंटी कार्ड देण्यात आले आहे.सर्वसामान्य जनतेला केंद्र बिंदू मानून विकास करण्यात येणार आहे.गरिब कुटुंबातील प्रत्येक महिलाला एक लाख रुपये देण्यात येणार आहे.शेतकऱ्यांना साठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.बेरोजगार तरुणांना नोकरी देणार आहेत.महिलासाठी लखपती योजना राबविली जाईल अशा लोकाभिमुख योजना सर्वसामान्य जनतेसाठी राबविल्या जातील.

या सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आपले विचार माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी मांडले.ते म्हणाले की,लातुर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे हे उच्चशिक्षित असुन मतदारसंघाच्या समस्यांची जाण आहे.या सरकारने आरक्षणासाठी सर्वच समाजाला आश्वासन देऊन ते आश्वासन पुर्ण केलेले नाही.मराठा विरोधात ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही.हमीभाव देण्यात सरकार अपयशी ठरले आहे.महागाई मुळे जनता मेकाखुटीला आली आहे.सर्वच आघाड्यावर सरकार अपयशी ठरले आहे.

यावेळी या सभेत चाकूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर म्हणाले की,नोटबंदीच्या काळात निष्पाप लोकांचा बळी गेला आहे.बेरोजगार तरुण,शेतकरी,शेतमजुर,व्यापारी,कामगार,सर्व घटक मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेहाल झाले आहेत.शेतकऱ्यांना अनुदान २०००/- द्यायचे आणि खत बी-बियाणे महाग करण्याची अशी शेतकरी विरोधी निती या सरकारची आहे.त्यामुळे या सरकारला सत्तेवरुन खाली खेचा असे आवाहन केले आहे.

या सभेच्या व्यासपीठावर लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी,कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती निळंकठ मिरकले,जिल्हा बॅंकेने संचालक एन.आर.पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालूकाध्यक्ष शिवाजी बैनगीरे,शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख नंदकूमार पवार,माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव बुदरे,अहमदपूर तालूका काॅग्रेंस कमिटीचे अध्यक्ष डाॅ.गणेश कदम,माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत मद्दे,माजी पंचायत समीती सदस्य अनिल चव्हाण,शहराध्यक्ष काॅंग्रेस पप्पूभाई शेख, सोशल मिडीया प्रमुख सलीमभाई तांबोळी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष बाबुमियॉं दापकेवाले, अहमदपूर विधानसभा युवक काॅंग्रेस अध्यक्ष निलेश देशमुख,नगरसेवक अभिमन्यू धोंडगे उपस्थित होते.या सभेला जानवळ आणि पंचक्रोशीतील गावातील मतदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.