एकल महिला संघटनेच्या लातुर रोड गावशाखेचे थाटात उद्घाटन..!
लातूर रोड शाखेचे बीडच्या रणरागिणी रुक्मिणी नागापूरे यांच्या हस्ते उद्घाटन.

एकल महिला संघटनेच्या लातुर रोड गावशाखेचे थाटात उद्घाटन..!
मुख्य संपादक-सुनिल जाधव मो-9766553995
चाकूर-भारताला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे पूर्ण झाले तरी आजपर्यंत महिलांचे संरक्षण होत नाही म्हणून १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या ७९ व्या स्वातंत्र्य दिनी चाकूर तालुक्यातील लातूर रोड येथे आज एकल महिला संघटनेच्या गावशाखेचे उद्घाटन करण्यात आले.एकल महिला संघटनेचे कार्य जोमाने सुरु असल्याने महिलांची एकजूट असून मोठ्या संख्येने महिला संघटनेत सहभागी होत आहेत,तसेच महिलांच्या विविध समस्या संदर्भात महिला ग्रामसभेत आपले प्रश्न घेऊन जातात व सोडवणूक पण करतात तसेच महिलांना एकल महिला संघटनेच्या कामाबाबत तळा गाळापर्यंत माहिती व्हावी व त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी गावागावांत गावशाखेची स्थापन करण्यात येत आहे.
यावेळी एकल महिलेच्या पदाधिकारी यांच्याहस्ते प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक उदय गुंडीले व संदीप गुंडरे,घारोळा गावच्या सरपंच सत्यभामा चिंते, लातूर रोडच्या माजी सरपंच वसुंधरा मुंढे, घरणी गावशाखेच्या कविता भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती तर सर्व मान्यवरांचे प्रास्ताविक उद्धेशिकेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आले तर लातूर रोड गावशाखेचे अध्यक्ष कौशल्या मुंढे,सचिव शितल कदम,सदस्य आशा बावने,वर्षाताई शिंदे, जोत्स्ना कांबळे या पदाधिकारीच्या उपस्थितीत लातुर रोड शाखेचे थाटात उद्घाटन करण्यात आले.
यावेळी एकल महिला संघटनेच्या चाकूर तालुका सचिव हजरतबी शेख यांनी लातुर रोड गावशाखेच्या उद्घाटनप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.शेवटच्या वस्ती वाडीतील महिलांचे प्रश्न समोर यावेत त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी या गावशाखेची गरज आहे व तमाम महिलांचे प्रश्न मार्गी लागतील म्हणून गावागावांत एकल महिला संघटनेच्या शाखा स्थापन करण्यात येत आहेत,तालुका आणि जिल्हा पातळीवर महिलांना अडचणी सोडविण्याचा आमचा प्रयत्न राहील असे चाकूर तालुक्याच्या सचिव हजरतबी शेख यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
यावेळी महिलांनी एकमेकांना राखी बांधून आम्ही एकमेकांना साथ देऊ एकमेकांना समजून घेऊ व एकमेकींच्या अडचणी समजून घेऊन सोडवू व एकमेकींचे रक्षण करु असा एकजूटीचा संदेश एकमेकींच्या हाताला राखी बांधून केला.
या कार्यक्रमाला एकल महिला संघटनेच्या कार्यकर्त्या आम्रपाली तिगोटे,सुरेखा गोटमुकले,भाग्यश्री रणदिवे,बीड जिल्ह्यातील एकल महिला संघटनेच्या रुक्मिणी नागापुरे यांनी आपली उपस्थिती दर्शविली.
लातूर रोड येथील गावशाखेच्या उद्घाटनप्रसंगी तालुक्यातील महिला या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.