आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पत्रकारांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमाने माझी भूमिका जनतेपर्यंत पोहचवावी..!

लातुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.शिवाजीराव काळगे यांचे प्रतिपादन

संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995

पत्रकारांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमाने माझी भूमिका जनतेपर्यंत पोहचवावी..!

लातुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.शिवाजीराव काळगे यांचे प्रतिपादन… 

गुढीपाडवा सणाचे औचित्य साधून लातुर जिल्ह्यातील पत्रकारांना माजी वैद्यकीय मंत्री तथा लातुरचे भुमीपुत्र आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडून स्नेह भोजनाचे आमंत्रण देऊन लातुर येथील वाडा या हॉटेलवर स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अमित विलासराव देशमुख व लातुर लोकसभेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.शिवाजी बंडप्पा काळगे यांनी सर्व पत्रकार बांधवांचा जाग्यावर जाऊन स्नेह भोजनाच्या आमंत्रणाला मान देऊन उपस्थित राहिल्या बद्दल सर्वांच्या हातात हात देऊन शब्दसुमनाने स्वागत केले.

डॉ.शिवाजी काळगे यांनी प्रसार माध्यम ही भुमिका फार महत्त्वाची आहे व त्यामध्ये प्रिंट मिडिया,इलेक्ट्रॉनिक मिडिया,युट्यूबर असो जे की,सर्वांनी माझे म्हणणे जनतेपर्यंत पोहचवावे मला साथ द्यावे असे प्रतिपादन काळगे यांनी पत्रकार यांना केला.यामध्ये काळगे पुढे बोलताना म्हणाले की,प्राथमिक शिक्षण राणी अंकुलगा व माध्यमिक शिक्षण देशीकेंद्र विद्यालय लातुर येथे तर वैद्यकीय शिक्षण हे औरंगाबाद संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले असून आज २६ वर्षे झाले लातुर जिल्ह्यातील जनतेला नेत्र रुग्णालयामार्फत आपल्या सेवेत आहे व आता महाविकास आघाडीने आपली सेवा करण्यासाठी लोकसभेची उमेदवारी मला दिली आहे आणि तुम्ही मला सहकार्य करावे व आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे सांगितले.

यावेळी माजी आमदार दिनकर माने,अशोकराव पाटील निलंगेकर,सुनिल बसपुरे,संजय शेटे,उदय गवारे,जयप्रकाश दगडे,अभय साळुंखे व इशांत भद्रेश्वर आदीजण व्यासपीठावर उपस्थित होते.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.