आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

निबंध स्पर्धेत लातुर जिल्ह्यातून प्रथमेश सोनकांबळे प्रथम..! 

शेळगावच्या शाहू विद्यालयातील विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव..

संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995

निबंध स्पर्धेत लातुर जिल्ह्यातून प्रथमेश सोनकांबळे प्रथम..! 

शेळगावच्या शाहू विद्यालयातील विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव..

चाकूर तालुक्यातील शाहू विद्यालय शेळगाव येथील प्रथमेश राहूल सोनकांबळे हा इयत्ता नववी मधील विद्यार्थी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमातंर्गत घेतलेल्या निबंध स्पर्धेत भाग घेऊन जिल्हास्तरावर प्रथम पारितोषिक प्राप्त केला आहे.

शेळगांव येथील शाहू विद्यालय हे सतत अनेक उपक्रमामुळे चर्चेत असणारे विद्यालय आहे.या विद्यालयातील विद्यार्थी प्रथमेश सोनकांबळे याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.दि.०५ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत हे यश मिळवले आहे त्याच्या या यशाबद्दल डाॅ.विद्या गुरुडे सहाय्यक संचालक,आरोग्य सेवा (कुष्ठरोग) लातुर यांनी रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक हाके एन.बी,विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांनी शुभेच्छा दिल्या.या स्पर्धेसाठी विठ्ठल घुले व सुगावे बालाजी स्काऊट मास्टर यांनी मार्गदर्शन केले.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.