आपला जिल्हामहाराष्ट्र

वाळूचे सहा टिप्पर चाकूर पोलीसांच्या ताब्यात,चौकशी करुन कारवाईचा निर्णय-पोलीस अधिकारी बी.चंद्रकांत रेड्डी

रात्री-बेरात्री वाळू वाहतूक जोमात,प्रशासन मात्र कोमात..

संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995

आष्टा मोड येथे अवजड वाहनांची तपासणीवेळी वाळूचे सहा टिप्पर चाकूर पोलिसांच्या ताब्यात..! 

वाळू वाहतूकीला आशिर्वाद महसूलचा का?पोलीस प्रशासनाचा?याकडे जनतेचे लक्ष..

चाकूर तालुक्यातील आष्टा मोड येथील नाका बंदीवर क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहतूक करणारे वाहनांची तपासणी करत असताना वाळूने भरलेले सहा टिप्पर चाकूर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करत आहेत या सहा टिप्परवर चाकूर पोलीस प्रशासन काय कारवाई करेल याकडे सर्व जनतेचे लक्ष वेधले असून जनता वाट बघते ती आता वाळूमाफिया वर कारवाई की माफी या निकालाची,मग समजेल की यांच्यावर आशिर्वाद कोणाचा ते.

तालुक्यात अवैध धंद्यांला वेग आला असून यावर आळा घालण्यासाठी चाकूर पोलीस स्टेशन हे कंबर कसली आहे.नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथून रात्री-बेरात्री वाळू घेऊन लातूरला जात असलेल्या टिप्परला शुक्रवारी रात्री अष्टामोड टोल नाक्यावर नाकाबंदी करुन क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची तपासणी करताना सहा टिप्पर एकापाठोपाठ टोल नाक्यावर आली तेव्हा त्या टिप्परमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळू घेऊन जात होते म्हणून त्या सहा टिप्परला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस उपविभागीय अधिकारी बी.चंद्रकांत रेड्डी यांच्या पथकाकडून या सहा टिप्परची रॉयल्टी भरली आहे किंवा नाही आणि महसूल विभागाची परवानगी आहे किंवा नाही याची चौकशी करुन अहमदपूर उपविभागीय अधिकारी व नांदेड येथील महसूल अधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन संबंधित सहा टिप्परवर कारवाई करण्यात येईल असे यावेळी पोलीस अधिकारी रेड्डी यांनी सांगितले.

लोहा,गंगाखेड,बिलोली,माळेगाव येथून सरासपणे अवैध वाळू वाहतूक होत असल्याने याला आशीर्वाद कोणाचा असेल असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे यावर चाकूर पोलिसांनी बेसुमार होत असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर तपासणी करुन त्यावर कारवाई करण्याचे पाऊल उचलतील का ?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.