आपला जिल्हामहाराष्ट्र

वाळूमाफियांना शक्कल चालविणे,आले स्वता:च्या आंगलट..! 

चाकूर पोलीसांकडून वाळूमाफियांवर कारवाई,१ कोटी ३७ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त..

संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995

वाळूमाफियांना शक्कल चालविणे,ठरली स्वत:ची डोकेदुखी..! 

ऑनलाईन बनावट परवानाधारक यांच्यावर चाकूर पोलीसांकडून कारवाई,१ कोटी ३७ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त..

ऑनलाईन बनावट परवाने काढून रात्री-बेरात्री चोरटी वाळू वाहतूक करुन विक्री करणाऱ्यावर चाकूर पोलीसांनी धडाडीची कारवाई करुन त्यांच्याकडून १ कोटी ३७ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांनी दिली.

लातुर-नांदेड रस्त्यावरील आष्टा मोड टोल नाक्यावर नाकाबंदी करुन अवजड वाहनांची क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणारे वाहनांची तपासणी करत असताना सहा टिप्पर शुक्रवारी रात्री चाकूर पोलीसांच्या पथकांकडून ताब्यात घेण्यात आले होते,त्या टिप्परची उपविभागीय पोलीस अधिकारी बी.चंद्रकांत रेड्डी यांनी चौकशी केली असता वाळू विक्री करण्यासाठी बनावट ऑनलाईन परवाने असल्याचे दिसून आले.गाडी क्रं.एमएच-२४ बी डब्ल्यू २७२७,एमएच-२४ ए यू ७७२७,एमएच-२४ बी डब्ल्यू ७७२७,एमएच-०५ ए एम ३५५० एमएच-२४ ए यू ५७३० या क्रमांकाचे पाच टिप्परवर त्यामधील क्षमतेपेक्षा जास्त वाळू ब्रासमध्ये मोजल्यास अंदाजे मुद्देमाल १ कोटी ३७ लाख ३६ हजार रुपयांचा पोलीसांनी ताब्यात घेऊन विष्णू गोपीनाथ गुंडरे,सुर्यकांत बबनराव कलमे,सिराज इस्माईल शेख,यांच्या फिर्यादीवरुन आठ आरोपींविरुद्ध चाकूर पोलीसांत कलम ४२०,४६७,४६८ नुसार त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आतापर्यंतची चाकूर पोलीस ठाण्यातील वाळूमाफियांच्या विरोधातील पोलीस उपविभागीय अधिकारी बी.चंद्रकात रेड्डी यांच्याकडून करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे,तरी पुढील तपास पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक होनाजी चिरमाडे हे करीत आहेत.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.