आपला जिल्हाताज्या घडामोडी

चाकूरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विविध ठिकाणी अभिवादन..

आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती.

संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995

चाकूरमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विविध ठिकाणी अभिवादन..

आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती. 

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चाकूर शहरात विविध ठिकाणी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन करुन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये चाकूर अहमदपूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमीचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.तर छत्रपती शाहू महाराज चौक व लिंबोनी नगरमध्ये नगराध्यक्ष कपिल माकणे यांनी ध्वजारोहण केले.क्रांतीनगर मध्ये नगरसेवक साईप्रसाद हिप्पाळे, सिद्धार्थनगरमध्ये जेष्ठ पत्रकार अनिल वाडकर,विठ्ठल महालिंगे,डॉ.आंबेडकर नगरमध्ये नगरसेविका ज्योती स्वामी,वैशाली बुद्ध विहारात वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतीक्षा तोडकरी तर बौध्दनगर मध्ये नगरसेवक अभिमन्यू धोंडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

विविध ठिकाणी पार पडलेल्या ध्वजारोहण व अभिवादन कार्यक्रमास जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा बांधकाम सभापती मिलिंद महालिंगे,उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार,काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील,नगरपंचातीचे गटनेते करीमसाहेब गुळवे,नगरसेवक नितीन रेड्डी,शिवदर्शन स्वामी,राम कसबे,महम्मद सय्यद,बाळू लाटे,रिपाइचे जेष्ठ नेते लक्ष्मण तिकटे,राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू तिकटे,तालुकाध्यक्ष विश्वनाथ एडके,काँगेसचे शहराध्यक्ष हुसेन शेख,व्ही.एस.पॅन्थरचे जिल्हाध्यक्ष शरद किनीकर,प्रहारचे तालुकाध्यक्ष वर्धमान कांबळे,साजिद लखनगावे,सागर होळदांडगे,पत्रकार अ.ना. शिंदे,संग्राम वाघमारे,सुधाकर हेमनर,संजय पाटील,रंगनाथ वाघमारे,प्रा.भीमराव साळवे, प्रा.बाळासाहेब बचाटे,प्रा.वैजनाथ सुरनर, धनराज सूर्यवंशी,रानबा नाईकवाडे,बाबूभाई दापकेवाले,हाकानी सौदागर यांच्या सह अनेक मान्यवर व बौध्द उपासक उपासिका मोठया संख्येने उपस्थित होते.बौध्द नगरमध्ये काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रा. वैजनाथ सुरनर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी सविस्तर माहिती सांगितली.

यावेळी संध्याराणी बनसोडे,देवराज महालिंगे,मानसी भालेराव,संस्कार वाघमारे,समीक्षा गायकवाड,जयराज महालिंगे या विध्यार्थ्यांचीही भाषणे झाली.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.