आपला जिल्हाताज्या घडामोडी

स्वातंत्र्य सैनिक बळीरामजी सोनटक्के यांच्या जीवनशैलीचा अवलंब करावा-आ.बाबासाहेब पाटील

बळीरामजी सोनटक्के यांचे ९९ वर्षात पदार्पण..

संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995

स्वातंत्र्य सैनिक बळीराम सोनटक्के यांच्या जीवनशैलीचा अवलंब करावा-आ.बाबासाहेब पाटील

स्वातंत्र्य सैनिक बळीरामजी सोनटक्के यांचे ९९ व्या वर्षात पदार्पण

आजच्या पिढीने स्वातंत्र्य सैनिक बळीरामजी सोनटक्के यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीचा अवलंब करुन सदृढ,निरोगी,क्रियाशील दीर्घायुष्य जगावे असे मनोगत वाढदिवसानिमित्त आमदार बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.यावेळी नगराध्यक्ष कपिल माकणे,प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या ज्योती बहेनजी यांची प्रमुख उपस्थिती होती. मातृशक्ती स्थळ म्हणून सुपरिचित असलेल्या चाकूर येथील माय मंदिर येथे आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य सैनिक श्री.बळीरामजी बापूराव सोनटक्के (चाकूर जि.लातूर) यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.स्वातंत्र्य सैनिक बळीरामजी सोनटक्के यांनी सुदृढ,निरोगी,क्रियाशील आयुष्याची ९८ वर्षे पूर्ण करुन ९९ व्या वर्षात पदार्पण केले आहे.

त्याबद्दल आप्तस्वकीय,विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या वतीने त्यांचे अभिष्टचिंतन करून दीर्घायुष्याची कामना करण्यात आली.यावेळी आमदार बाबासाहेब पाटील,नगराध्यक्ष कपिल माकणे,प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या ज्योती बहेनजी,सुशिला नागिमे बहेनजी,ग्राहक तक्रार मंचाचे दत्ता पाटील,महालक्ष्मी प्युअर व्हेजचे संजय मिरकले पाटील,अशोकराव मिरकले पाटील,अनिल वाडकर,धनंजय जाधव,जय जवान साखर कारखान्याचे माजी संचालक बालाजी सुर्यवंशी. प्रगतशील शेतकरी देविदास होळदांडगे, शंकर सोनटक्के,संभाजी सोनटक्के,राष्ट्रीय खेळाडू शिवकुमार सोनटक्के,युवा नेते सागरभैया होळदांडगे,विशाल विविध सोसायटीचे संचालक अजयकुमार नाकाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप शेटे,राष्ट्रवादी सेवा दलाचे तालुकाध्यक्ष शिवदर्शन स्वामी, रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष पपन कांबळे,श्रीकांत चव्हाण,ॲड.बसवेश्वर जनगावे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.