आपला जिल्हाताज्या घडामोडी

अजब नगरपंचायतींचा गजब कारभार,८० लाखाच्या पाईपलाईनला ५३ लाखाचा महसूल….! 

चाकूर नगरपंचायतींचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर.... 

संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज चाकूर लातुर मो-9766553995

अजब नगरपंचायतींचा गजब कारभार,८० लाखाच्या पाईपलाईनला ५३ लाखाचा महसूल….! 

चाकूर नगरपंचायतींचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर…. 

चाकूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ८० लाखाची पाईपलाईन करण्यात आली पण ती पाईपलाईन अनधिकृत पद्धतीने खोदकाम करुन केली आहे असे म्हणून चाकूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एस.टी निकम यांनी मुख्याधिकारी नगरपंचायत चाकूर यांना ५३ लाख ५५ हजार रुपये एवढा महसूल तात्काळ भरुन घ्यावा अशी नोटीस दिली.

तरीही नगरपंचायत चाकुर कार्यालयाने नोटीस दिल्यानंतर ही महसूल न भरल्यामुळे पुन्हा स्मरणपत्र दिले आहे,या संदर्भात मुख्याधिकारी अजय नरळे यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही कोणतीही अनाधिकृत पाईपलाईन खोदली नाही पाईपलाईन करण्यापूर्वी परवानगी मागितली होती,परंतु आचारसंहिता लवकर लागणार असल्यामुळे पाणी हे अत्यावश्यक आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पाईपलाईनचे काम केले आहे,तरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे महसूल माफ किंवा कमी करावा या संदर्भात पत्र व्यवहार करणार आहोत अशी प्रतिक्रिया प्रतिनिधीशी बोलताना मुख्याधिकारी यांनी दिली.

या सर्व गोष्टीवरुन यात चूक कोणाची?महसूल भरणार कोण?या प्रश्नाची उत्तरे जरी नाही सापडली तरीही सर्वसामान्य जनतेच्या करातूनच महसूल भरावा लागेल का? हे मात्र येणारी वेळ सांगेल,पाईपलाईनचे खोदकाम करण्यापूर्वी अतिरिक्त महसूल भरावा लागणार नाही,जनतेवर त्याचा अधिकचा भुर्दंड लागणार नाही,याची सर्व खात्री करुनच काम करायला हव होतं अशी जनतेतून चर्चा होताना तरी सद्या दिसत आहे,यावर नगरपंचायत चाकूर काय तोडगा काढू शकते का?याकडे सर्वांचे आता लक्ष वेधले आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.