आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

चाकूरच्या शेतकऱ्याची लेक बनली डॉक्टर……!

डॉ.आलमले यांचा दुसऱ्या विद्यार्थ्यास प्रेरणादायी आदर्श ठरणारा.

डॉ.शरयू आलमले या मुलीचे आदर्श दुसऱ्या विद्यार्थ्यांस प्रेरणादायी…..

प्राथमिक शिक्षणापासून वर्गात प्रथम क्रमांकावर राहिलेल्या शरयु शिवरुद्र आलमले या सामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुलीने नीटच्या परिक्षेत ६२१ गुण घेऊन मुंबईच्या नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळविला चार वर्षाच्या अथक परिश्रमानंतर एम.बी.बी.एस ची पदवी प्राप्त करुन आई वडीलांसह तीने लहानपणापासून पाहिलेले डाॅक्टर होण्याचे स्वप्न पुर्ण केले आहे.

चाकूर येथील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेली शरयु शिवरुद्र आलमले ही आज डॉक्टर बनली आहे.शरयूचे प्राथमिक शिक्षण शहरातील लोकमान्य प्राथमिक विद्यालयातून घेतला पुढे तिने पाचवीसाठी शहरातील जगत जागृती माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतला.पहिलीपासून ती वर्गात अभ्यासात प्रथम क्रमांकावर होती. शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे तिने सहावीला लातुरच्या जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविला.दहावीला चांगले गुण घेत तिने लातुरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात प्रवेश मिळविला.पुढे नीट परीक्षेत तिने ६२१ घेत मुंबईमधील सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस साठी प्रवेश मिळविला व जिद्दीने एम.बी.बी.एस ची परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर बनली आहे.

शरयू ने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.शरयूचं हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी तिच्या आई-वडील आजी,आजोबा,मामा यांनी खूप मेहनत घेतलेत त्यांनी नेहमीच तिला शिक्षण सुरु ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे.शरयूचे वडील हे शेतकरी आहेत तर आई ही गृहिणी आहे.

शरयू ची आई सुवर्णा आलमले बोलताना म्हणाल्या की माझ मुलांसाठी लहानपणापासूनच स्वप्न होतं की माझी मुलं चांगले शिक्षण घेऊन उच्चशिक्षित होऊन नावलौकिक करावे यासाठी माझी आई भागीरथी शेटे व भाऊ युवराज पाटील यांनी शरयू डॉक्टर होण्यासाठी ज्या अडचणी आल्या त्या सोडवण्यासाठी मदत केली.शरयू ही तिच्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर डॉक्टर बंनली आहे व तिची आई म्हणून मला सार्थ अभिमान असल्याचेही सांगितले.

शरयू चे वडील शिवरुद्र आलमले बोलताना म्हणाले की शरयूला डॉक्टर बनण्यामध्ये तिच्या आईचा सिंहाचा वाटा आहे व मुलीनेही मेहनत घेऊन डॉक्टर बनली हा आनंद माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.

शरयू बोलताना म्हणाली की मुंबई सारख्या मोठ्या शहरात माझा एम.बी.बी.एस साठी नंबर लागल्यानंतर मुंबईमध्ये राहणं,तिथले वातावरण,तिथपर्यंत प्रवास करुन जाणं हे माझ्यासाठी अवघड होतं पण तिथे गेल्यानंतर असं वाटलं की काही नाही होऊन जाईल तिथले शिक्षक,माझ्या वर्ग मैत्रिणी यांच्यामुळे माझा हा प्रवास एकदम सोपा वाटला व माझे आई-वडील,आजी-आजोबा,मामा यांनी नेहमीच मला प्रोत्साहन दिल्यामुळे मी एम.बी.बी.एस ची परीक्षा उत्तीर्ण होऊन आज मी डॉक्टर बनू शकले असे यावेळी शरयूने सांगितले आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.