केशवराव पाटील विद्यालयात अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्याचे वाटप..!
५४ व्या वाढदिवसानिमित्त ५४ झाडे लाऊन वाढदिवस साजरा.

मुख्य संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज मो.9766553995
अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्याचे वाटप.
सामाजिक कार्यकर्ते व शैक्षणिक क्षेत्रात आपली कार्य सिद्धिपणास लावणारे कार्यकारी संचालक,सिध्दी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि.उजनाचे मा.अविनाश जाधव यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त ५४ वृक्षांचे वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाच्या संदेशा बरोबरच समाजामध्ये एक आगळा वेगळा उपक्रम या माध्यमातून जोपासण्यात आला.
सातत्याने सामाजिक कार्याला चालना देणारे मा. अविनाश जाधव यांच्या या पर्यावरण पूरक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या वाढदिवसाच्या निमित्ताने,केशवराव पाटील विद्यालय,बोथी व परिसरात झाडे लाऊन शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले.
यावेळी शिवाजीराव काळे तालुकाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळीराम पाटील,बालासाहेब पाटील, गणपतराव नितळे,विश्वनाथ एडके,सुर्यकांत पाटील, बालाजी आवाळे,राजाराम महात्मे,श्री युवराज आलट,परमेश्वर नवगन,गोविंद घुगे,संतोष घुगे,शेषेराव कांबळे,आणि इतर ग्रामस्थ व विद्यार्थी,शिक्षक वृंद उपस्थित होते.हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संरक्षणास हातभार लावणारा ठरला.