आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

तीर्थक्षेत्र हनुमान मंदिरासमोरील घनकचरा कचराकूंडी काढण्यासाठी गटविकास अधिकारी यांना निवेदन….!

ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी,अन्यथा १० दिवसांनी अमरण उपोषणाचा इशारा..

संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995

तिर्थक्षेत्र पाण्यातील मारोती मंदीरासमोरील घणकचऱ्याचे बांधकाम हटवा.. 

गटविकास अधिकारी यांना ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी…. 

चाकूर तालुक्यातील प्राचीन काळातील नवसाला पावणारा पाण्यातील मारोती म्हणून ज्याची ओळख जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातून भाविक भक्त हणमंतवाडी येथे मंदिरात दर्शनासाठी येत असतात याच तिर्थवाडी व हणमंतवाडी ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या या मंदिराची भव्य उभारणी करण्यात आली असून येथील तीर्थक्षेत्र श्री.हनुमान मंदीराच्या प्रवेशद्वारासमोर ग्रामपंचायत अंतर्गत घणकचरा व्यवस्थापनाचे बांधकाम करण्यात आले असून सदरील बांधकाम काढून मंदिरासमोरील स्वच्छता राखण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात त्या कचऱ्यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी पसरुन भक्तांच्या आरोग्यास धोका आणि मंदीराच्या पावित्र्याची विटंबना होणार आहे.त्या बांधकामामुळे वाहतुकीस,रहदारीस आणि येणाऱ्या भाविक भक्तास अडथळा निर्माण झाला आहे.

तरी सदरील बांधकाम काढून टाकून ते इतरत्र हालवण्यात यावे तसेच सदरील बांधकाम १० दिवसांत काढले नाही तर सर्व ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार आहोत असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनावर यशवंत नरवटे,माधव वाघ, सुनिल तुकाराम गुळवे,बालाजी नरवटे,बाजीराव आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.