लोकसभेसाठी जानवळकरांचा एकच विचार,कॉंग्रेसच्या विजयाचा निर्धार…..
लातुरचा खासदार बदलण्याचा जानवळकरांचा विचार..
संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995
जानवळकरांचा लोकसभेचा एकच विचार,कॉंग्रेसच्या विजयाचा निर्धार…
लातुर लोकसभा निवडणुक २०२४ कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.शिवाजीराव काळगे यांची चाकूर-अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील चाकूर तालुक्यातील जानवळ पंचायत समिती सर्कल मधील भागवतजी कुसंगे यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली.
या बैठकीत जानवळ पंचायत समिती अंतर्गत येणारी रामवाडी,रायवाडी,राजेवाडी,केंद्रेवाडी,दापक्याळ,शिवणी,झरी(बु),महाळंगी व हाडोळी या गावातील कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन लातुर लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली व जानवळकरांच्या वतीने डॉ.शिवाजीराव काळगे यांच्या विजयाचा निर्धार करुन त्यांना लोकसभेवर पाठविण्याचा एकच विचार करण्यात आला.
याप्रसंगी लातुर महानगरपालिकेचे माजी महापौर डॉ.विक्रांतजी गोजमगुंडे,लातुर शहर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किरण जाधव पाटील,चाकूर कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासरावजी पाटील चाकूरकर,एन.आर पाटील,डॉ.गणेश कदम,चंद्रकांत मुद्दे,सिरजोद्दीनजी जहागीरदार,निलेश देशमुख,नागनाथ पकाले,अरविंद साबने,आत्माराम गव्हाणे,रघुनाथ पाटील,बळीराम सुरवसे,नरसिंग वाघमारे तसेच सर्व कॉंग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते व बुथ प्रतिनिधी यावेळी या बैठकीला उपस्थित होते.