आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाच्या लातुर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राधाकिशन तेलंग यांची नियुक्ती

शरदचंद्र पवार गटाच्या जानबा मस्के यांच्या हस्ते राधाकिशन तेलंग यांची निवड

संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995

राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाच्या लातुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी राधाकिशन तेलंग.. 

राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाच्या लातुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी राधाकिशन धोंडीराम तेलंग यांची नियुक्ती शरदचंद्र पवार गटाच्या सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष जानबा मस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने नियुक्ती पत्र देऊन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाच्या लातुर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक खेडेगावातील जनतेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे मजबुतीकरण करताल अशी अपेक्षा ठेऊन निवड करण्यात आली आहे.

यावेळी माजी राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे जेष्ठ नेते विनायकराव पाटील,माजी सभापती प्रशांत पाटील,जेष्ठ नेते गणेश फुलारी,संचालक दत्ता आलमाजी,शहराध्यक्ष बाबुमियॉं दापकेवाले,सोमेश्वर बेलाळे रामभाऊ खंदाडे,शरण चौंडे,सुधीर गोरटे इत्यादीसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तेलंग यांचा सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत अशी माहिती शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते युवराज पाटील यांनी दिली आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.