आपला जिल्हा

अलगरवाडीची तेजस्विनी पटणे मेट्रो ब्रेन अबॅकसमध्ये महाराष्ट्रातून प्रथम…..!

ज्ञानदीप स्कॉलर नॅशनल स्कूल चाकूरची विद्यार्थीनी तेजस्वीनी पटणे

मुख्य संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995

तेजस्विनी पटणे मेट्रो ब्रेन अबॅकसच्या परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकावर….. 

मेट्रो ट्रेन अबॅकसची ६ वी नॅशनल लेवल मेट्रो अबॅकस परीक्षा नुकतीच लातूर येथे पार पडली.यामध्ये या परीक्षेसाठी जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातून २५०० ते २८०० विद्यार्थ्यांनी या परीक्षेस बसले होते.ज्ञानदीप मेट्रो ब्रेन अबॅकस अकॅडमी चाकूरची विद्यार्थिनी तेजस्विनी सिध्देश्वर पटणे या विद्यार्थिनीने मिनीटात १०० प्रश्न सोडवून ५०० पैकी ५०० गुण मिळवून झेड लेवल परिक्षेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.

यावेळी मराठी चित्रपट सिने अभिनेत्री माधुरी पवार,हास्य कलाकार ओम यादव तसेच मेट्रो ब्रेन अबॅकसचे संचालक संतोष लोहारे यांच्या हस्ते तेजस्विनी सिद्धेश्वर पटणे या विद्यार्थिनीचा मेडल व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.

माझ्या वडीलांचे रात्रीच्या १० वाजता फोन आला आणि खूप उशीर झाला आहे कुठे आहेस म्हणून विचारले तेंव्हा मी म्हणालो लातुरमध्ये तेजस्विनीच्या निकालाच्या कार्यक्रमात आहे मग बाळा खूप उशीर झाला आहे आपण घरी जाऊ असे म्हटले असता तेंव्हा तेजस्विनी नाराज झाली आणि “अहो ! पप्पा माझा नंबर येतो” तर अगदी १० मिनिटाच्या कालावधीतच तेजस्विनी सिद्धेश्वर पटणे असे नाव पुकारण्यात आले मग कार्यक्रमाच्या स्टेजवर माझा व माझ्या मुलीचा येथोचित सत्कार करण्यात आला.

सिध्देश्वर पटणे

पालक

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.