आपला जिल्हा
वडवळ नागनाथ येथील माजी सरपंच सौ.शिल्पा बेंडके यांचे निधन
मुख्य संपादक:-सुनिल जाधव सेवा लाईव्ह न्यूज लातुर
सौ.शिल्पा बेंडके यांचे अल्पशा आजाराने निधन….
अत्यंत दुःखद बातमी….
वडवळ नागनाथ येथील माजी सरपंच सौ.शिल्पा राजकुमार बेंडके (वय ३८) यांचे अल्पशा आजाराने लातूर येथील खाजगी रुग्णालयात सोमवारी (दिं.४) रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.५) सकाळी ११ वाजता वडवळ नागनाथ येथील बेलपत्री स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती- राजकुमार माणिकराव बेंडके (व्यवस्थापक- इंदिरा महिला सहकारी बँक,शाखा- चाकूर),एक मुलगा,एक मुलगी,सासु -सासरे,दिर-भावजाई असा परिवार आहे.
!!कै.शिल्पा बेंडके यांना सेवा लाईव्ह वेब & न्यूज लातुरच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!!