आपला जिल्हाराजकीय

चाकूर नगरीत चंद्रशेखर बावनकुळे यांचे जंगी स्वागत

भाजपाच्या वतीने करण्यात आले स्वागत.

मुख्य संपादक-सुनिल जाधव सेवा लाईव्ह वेब & न्यूज लातुर मो:-9766553995

जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने फुलांचा हार घालून चंद्रशेखर बावनकुळे यांचे चाकूरात जंगी स्वागत… 

चाकूर नगरीत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे लातुर दौर्यावर आले असता चाकूर तालुका भाजपा पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष वसंतराव डिगोळे यांच्या नेतृत्वाखाली स्वागत करण्यात आले.भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अहमदपूर येथील सुपर वॉरियर्स संवाद बैठकीत त्यांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अहमदपूर दौर्यावर आले होते.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अहमदपूरच्या दिशेने जात असताना त्यांचा चाकूर नगरीत जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने फुलांचा मोठा हार घालून वाजत-गाजत भव्य जंगी स्वागत भाजपाच्या वतीने करण्यात आले.

यावेळी लातुर जिल्ह्याचे खासदार सुधाकर श्रृंगारे,माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,अरविंद पाटील निलंगेकर,बालाजी पाटील चाकूरकर,चाकूरचे नगराध्यक्ष कपील माकणे,रणजित मिरकले,नितीन रेड्डी,संगमेश्वर लाटे व तालूक्यातील भाजपचे कार्यकर्ते,महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

 

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.