आपला जिल्हाराजकीय

मतदानरुपी आशीर्वाद देऊन काम करण्याची संधी द्यावी-डॉ.शिवाजीराव काळगे

चाकूर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी साधला डॉ.काळगे यांनी संवाद..

संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995

सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मला सेवा करण्याची संधी मतदानरुपी आशीर्वाद देऊन करावे- डॉ.शिवाजीराव काळगे

चाकुर तालुक्यात कार्यकर्त्यांशी साधला संवाद…. ! 

लातुर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाने डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर चाकुर तालुक्यातील चापोली,वडवळ ना.झरी,जानवळ,सर्कल मधील माहाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

चापोली येथील बैठकीत बोलताना विक्रांत गोजमगुंडे म्हणाले की, डॉ.शिवाजी काळगे यांच्या रूपाने निष्कलंक, चरित्रसंपन्न, उच्च्‍विद्याविभूषित लोकांच्या कामाला येणारे उमेदवार दिले आहेत.मतदारांनी डॉ.शिवाजी काळगे यांना येणाऱ्या ७ में रोजी भरघोस मतांनी विजय करावे असा दृढ संकल्प चाकुर तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते व पदधिकारी यांच्या बैठकीत करण्यात आला.

एन.आर.पाटील,विलासराव पाटील,यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले अहमदपुर-चाकुर विधानसभेतुन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मतांची आघाडी देऊ असा दृढ संकल्प केला.महाविकास आघाडीच्या सर्वच पक्ष पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी स्वत: उमेदवार समजून प्रचार कार्यात सक्रीय व्हावे असे आवाहन लातूर लोकसभेचे इंडीया (महाविकास) आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांनी प्रचारार्थ जनसंवाद दौऱ्यावर चाकुर तालुक्यातील महाविकास आघाडी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महाविकास आघाडी काँग्रेसचे लातूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार डॉ.शिवाजी काळगे उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.देशातील पुरोगामी विचाराचे पक्ष भारतात इंडिया आघाडी माध्यमातून निवडणूक लढवत आहे. तर राज्यात महाविकास आघाडी ही लोकसभेची निवडणूक लढवत आहे. काँग्रेसचे लातूर लोकसभेचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे हे व्यवसायाने डॉक्टर आहेत, नेत्रचिकीत्सक आहेत, अनेक दशके त्यांनी लातूरमध्ये रुग्णसेवा केली आहे. या उमेदवाराला मतदारापर्यंत घेऊन जाणे हे पदाधिकारी व कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. प्रत्येकाने लातूर लोकसभा मतदारसंघाचा काँग्रेसचा उमेदवार डॉ. शिवाजी काळगे मी स्वतः आहे असे समजून काम करून विजय मिळवून द्यावे.लातुर जिल्ह्यात गेल्या २७ वर्षापासून वैद्यकीय सेवा लाखो नागरिकांना डॉ.शिवाजी काळगे दिलेली आहे.गोरगरीब लोकांना त्यांनी मोफत सेवा दिली आहे.शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या मालास हमी भाव देण्यासाठी मी संसदेत आवाज उठवणार आहे.मी स्वतः शेतकऱ्यांचा मुलगा आहे.शेतकऱ्यांच्या समस्यांची मला पुर्ण जाणीव आहे.मतदार संघात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजुन कायमच आहे.त्याचे योग्य नियोजन करून कायम स्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडवू असे ते म्हणाले.

महिला,शेतमजुर,बेरोजगार,महागाई,दिवसेंदिवस वाढत चालेली महागाई रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे.टमाटे उत्पादकासाठी प्रक्रिया उद्योग चालु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले स्थानिक विद्यामान खासदार असताना गेल्या पाच वर्षात जन्मभुमी असलेल्या तालुक्यात विकास निधी आणण्यात अपयशी ठरले आहे. याप्रसंगी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब पाटील,चाकूर काँग्रेस तालुका अध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर, जिल्हा मध्यवर्ती बँकचे संचालक एन. आर. पाटील, डॉ. गणेश कदम, चंद्रकांत मद्दे, सिराजोद्दीन जहागीरदार, निलेश देशमुख,शेख पप्पूभाई, सलीमभाई तांबोळी,बी.एन.चाटे,अनिल चव्हाण,गंगाधर केराळे,बाळु इरवाणे,यांच्यासह तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

अहमदपूर – चाकूर विधानसभेतील प्रचार दौरा

चापोली धनंजयजी चाटे यांचे निवासस्थान (चापोली, शंकरवाडी, ब्रम्हवाडी, नायगाव, आनंदवाडी, अलगरवाडी, शिरनाळ, तिर्थवाडी, हणमंतवाडी, झरी बु. – एस. आर. जगताप यांचे निवासस्थान (झरी बु., बेलगाव, कडमुळी, जढाळा, दळवेवाडी, हणमंतजवळगा, हिंपळनेर, वाघोली, हाळी खु.) जानवळ – भागवत कुसंगे यांचे निवासस्थान (जानवळ, रामवाडी, रायवाडी, राजेवाडी, केंद्रेवाडी,महाळंगी, झरी (खु)दापक्याळ, शिवणी हाडोळी) वडवळ ना. – बाबुराव गंदगे यांचे निवासस्थान (वडवळ, ब्रम्हवाडी, घरणी, लातूररोड, मोहनाळ) येथे कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधण्यात आले.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.