आपला जिल्हाताज्या घडामोडी

चाकूर येथे आपले सरकार सेवा केंद्राचे भव्य उद्घाटन….!

लोकसभेचे भाजपा उमेदवार सुधाकरजी शृंगारे यांच्या हस्ते उद्घाटन

संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995.

सराफा लाईन चाकूर येथे आपले सरकार सेवा केंद्र आजपासून आपल्या सेवेत……. 

चाकूर तालुक्यातील अजनसोंडा येथील प्रसिद्ध किर्तनकार हरीराम महाराज अजनसोंडकर यांनी आपल्या उच्चशिक्षित मुलासाठी जनतेच्या सेवेसाठी आपले सरकार सेवा केंद्र (CSC) सेंटरची चाकूर मध्ये सराफा लाईन येथे उभारणी करण्यात आले आहे.

आज दि.२९ रोजी ठीक सकाळी ११ वाजता लक्ष्मीपूजन व होम हवन करुन लातूर जिल्ह्याचे माजी खासदार व महायुतीचे लोकसभेचे भाजपा उमेदवार सुधाकरजी शृंगारे यांच्या हस्ते या आपले सरकार सेवा केंद्राचे भव्य उद्घाटन करण्यात आले.यावेळी सर्व मान्यवरांचे बोकडे महाराजांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील,लातूर जिल्ह्याचे भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी देशमुख,भाजपाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर,भाजपाचे प्रदेश सरचिटणीस नितीनजी रेड्डी,अजनसोंडा गावचे सरपंच देविदास माने,कृषी सहाय्यक बिरादार,अभिज्ञ बॉईज हॉस्टेल लातूरचे संचालक लहू बिरादार व आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक सोहम बोकडे हे उपस्थित होते.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.