आपला जिल्हा

धनगर समाजाच्या वतीने चाकूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले निवेदन…..!

एस.टी आरक्षणाची अमलबजावणी करावी अन्यथा समाजाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल

संपादक:-सुनिल जाधव सेवा लाईव्ह न्यूज लातुर मो. 9766553995

धनगर समाजाच्या वतीने चाकूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले निवेदन…..!

धनगर समाजाच्या वतीने अनुसूचित जमातीच्या (एस.टी.)आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी चोंडी येथे धनगर समाज बांधवांनी आमरण उपोषण केले होते.यानंतर राज्य शासनाच्या वतीने अंमलबजावणीसाठी पन्नास दिवसाची मुदत दिली होती.मात्र आजपर्यंत काहीही निर्णय घेतला गेला नाही त्यामुळे सकल धनगर समाज चाकूर तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
मागील सत्तर वर्षामध्ये सर्वच सरकारांने धनगर समाजाला आरक्षण अंमलबजावणी पासून दूर ठेवले आहे.धनगर समाजाने सनदशीर मार्गाने राज्यातील विविध ठिकाणी आमरण उपोषण केले.जिल्ह्यापासून ते अगदी खेड्यापर्यंत आंदोलन केले.मात्र झोपेच्या सोंग घेतलेल्या सरकारने आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही.यावेळी निवेदनात खालील मागण्याची मागणी केली आहे.
धनगर समाजाच्या एस.टी.आरक्षणाची अंमलबजावणी करावी,आरक्षणासाठी उच्च न्यायालयात दाखल याचिकेत अड.कुंभकोणी यांची कायम नियुक्ती करावी तसेच न्यायालयात तात्काळ व दैनंदिन सुनावणी करता अर्ज दाखल करावे,मेंढपाळासाठी घोषित करण्यात आलेल्या दहा हजार कोटीच्या सहकारी महामंडळाचे जिल्हास्तरीय संस्था स्थापन झाल्या असून लवकरात लवकर सहकार मंडळाची घोषणा करून योजना कार्यान्वित करावी व स्वतंत्र अध्यक्षांची नेमणूक करावी,’जे अदिवासींना ते धनगरांना’ याप्रमाणे घोषित केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या बावीस योजना पैकी काही योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या नाहीत व संपूर्ण निधी सुद्धा उपलब्ध झाला नाही त्याबाबत आढावा घेऊन उपयोजना करावी,मेंढपाळावर होत असलेले हल्ले रोखणे व त्यावर स्वतंत्र कायदा आणून त्यांना संरक्षण देणे तसेच महसूल रेकॉर्ड मधील आरक्षीत चराई कुरणे क्षेत्र वार्षिक प्रती हेक्टर एक रुपया दर आकारणी करून स्थानिक मेंढपाळांना वाटप करावे,बिरोबा मंदिर देवस्थानच्या मुळ स्थानांच्या सर्वांगीण विकासासाठी व भाविकांच्या सोयीसुविधांसाठी आणि सुशोभीकरणासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी द्यावा,महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेले किल्ले विकास संवर्धनासाठी सरकारने ताब्यात घेऊन किल्ले विकास आराखडा त्वरित तयार करून त्याला मान्यता द्यावी, ज्या पद्धतीने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव करण्यासाठी तात्काळ व ठोस पावले उचलण्यात आली त्याच पद्धतीने अहमदनगर जिल्ह्याच्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी नगर नामांतरासाठी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावे.

या मागणीसाठी शासनाच्या वतीने पन्नास दिवसाचा वेळ मागितला होता पण आज पर्यंत शासकीय पातळीवर कोणतीही भुमिका घेतली गेली नाही,ही अतिशय खेदाची बाब आहे.मुख्यमंत्री पदी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला राजधर्म पाळावा लागतो,मुख्यमंत्री कोणत्याही विशिष्ट समुहाचे नसतात.ते सर्वांचे असतात. एका विशिष्ट समुदायासाठी आपण खास प्रयत्न करता आणि धनगर आरक्षणाकडे उदासीनता दाखवता.ही बाब अत्यंत खेदजनक आहे.मुख्यमंत्री म्हणून आपण तातडीने धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा सकल धनगर समाजाच्या वतीने संविधानिक मार्गाने चालणार्या तिव्र लढ्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा अल्टिमेट धनगर समाजाच्या वतीने चाकूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले­ आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.