आपला जिल्हामहाराष्ट्र

माहिती अधिकार कार्यकर्ता मराठवाडा सचिवपदी दत्तात्र्य बेंबडे यांची निवड.

शेतकरी योध्दा न्यूज चॅनेलच्या संपादकाची निवड.

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशनच्या मराठवाडा सचिव पदी दत्तात्र्य बेंबडे यांची निवड….! 

मुख्य संपादक:-सुनिल जाधव सेवा लाईव्ह न्यूज लातुर मो-9766553995

चाकूर प्रतिनिधी.दि.२२ नोव्हेंबर.

चाकूर येथील समाजकार्यात सतत अग्रेसर असलेले दत्तात्र्य बेंबडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मराठवाडा सचिव पदी निवड झाली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी बेंबडे यांना निवडीचे पत्र देऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.ही निवड तीन वर्षासाठी करण्यात आली असून भारतीय संविधान,भारतीय कायदे व माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघाची अचार संहिता यांचे काटेकोर पालन करावे.मराठवाडा सचिव पदावर राहून माहिती अधिकार अधिनियम २००५ चा व्यापक जन हितासाठी वापर करावा.तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये व समाजामध्ये माहिती अधिकार अधिनियम २००५ चा प्रसार व प्रचार करावा असे नियुक्ती पत्राद्वारे सांगण्यात आले आहे.
दत्तात्र्य बेंबडे हे चाकूर तालुक्यातील आनंदवाडी येथील असून त्यांनी आजपर्यंत अनेक समाजहीताचे कार्य केले आहेत.समाजात अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे काम त्यांनी सतत केले आहे.अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो असे ते बोलताना म्हणाले.माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघाने मला ही जबाबदारी दिली आहे. लवकरच मराठवाडा दौरा सुरु करणार आहे व गाव तेथे माहिती अधिकार कार्यकर्ता अशी मोहीम राबवणार आहे,मी या अगोदर ही माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम पाहिले आहे.

दत्तात्र्य बेंबडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघाच्या मराठवाडा सचिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे राजकीय,सामाजिक,पत्रकार संघटना,शासकीय कर्मचारी वर्गातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

मराठवाड्यात कोणत्याही  कार्यकर्त्यावर  अन्याय झाला असेल तर मी त्या व्यक्तीला निसंकोच पणे तात्काळ मदत करणार,आणि संपूर्ण मराठवाड्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून कार्यकर्त्याने हाक मारतील  त्या हाकेला मी धाऊन जाईल.”जीथे कमी,तीथे  आम्ही नाहीतर मी बेंबडे  राहील,कार्यकर्त्याला न्याय मिळवून देणारच. 

  ———दत्तात्र्य बेंबडे———             माहिती अधिकार        मराठवाडा  कार्यकर्ता, सचिव. 

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.