आपला जिल्हाताज्या घडामोडी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीच्या अध्यक्षपदी मिलींद महालिंगे तर सचिवपदी मिलींद कांबळे…

वैशाली बौद्ध विहार याठिकाणी बैठकीत सर्वानुमते निवड...

संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीच्या अध्यक्षपदी मिलिंद महालिंगे तर सचिवपदी मिलिंद कांबळे यांची सर्वानुमते निवड… 

चाकूर तालुक्यातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीची जिम्मेदारी अध्यक्ष म्हणून मिलिंद महालिंगे तर सचिव म्हणून मिलिंद कांबळे यांच्यावर सर्वानुमते निवड करुन सोपविण्यात आली आहे.या सार्वजनिक जयंतीची बैठक वैशाली बौद्ध विहार या ठिकाणी प्रा.भीमराव साळवे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी अध्यक्ष म्हणून मिलिंद महालिंगे उपाध्यक्ष पपन कांबळे,बाळू कांबळे,रुपेश गायकवाड,सचिव मिलिंद कांबळे,कोषाध्यक्ष चेतन महालिंगे,सल्लागार मधुकर कांबळे,प्रसिद्धीप्रमुख म्हणून सुशील वाघमारे यांची निवड करण्यात आली.या बैठकीला लक्ष्मण तिकटे,विलास महालिंगे,विष्णू तिकटे,प्रभाकर गायकवाड,नागसेन महालिंगे,बाबासाहेब कांबळे,मयूर कांबळे,संदीप महालिंगे,विक्की महालिंगे,गोपीनाथ कांबळे,रोहित कांबळे,दिवानजी गायकवाड,बाळासाहेब महालिंगे इत्यादी जण उपस्थित होते.

यावेळी बैठकीत सार्वजनिक जयंतीच्या नियोजनावर व स्वरुपावर सर्वांमध्ये चर्चा करण्यात आली व सर्वानुमते अध्यक्ष सचिवांची निवड करण्यात आली.चाकूर अहमदपूर विधानसभेचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी मिलिंद महालिंगे यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.