आपला जिल्हाताज्या घडामोडी

बायोमॅट्रिक प्रणाली सुरु करा-तहसीलदार जाधव

चाकूर शहरातील प्रशासकीय कार्यालय यांना तहसीलदारांचे आदेश..

बायोमॅट्रिक प्रणाली सुरु करा तहसीलदार नरसिंग जाधव यांचे शासकीय कार्यालय यांना आदेश…

चाकूर शहरातील २२ कार्यालयांना तात्काळ बायोमॅट्रिक प्रणाली सुरु करावी व बायोमॅट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर सुरु करण्यात यावा या बाबतचा अहवाल सादर करावा असे लेखी पत्राद्वारे तहसीलदार नरसिंग जाधव यांनी कळवले आहे.

शासनाच्या बायोमॅट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर पुन्हा सुरु करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक समय २०२०/प्र.क्र.३१/१८ (र.व.का)दि. २३ मे २०२२ या आदेशान्वये तहसीलदार नरसिंग जाधव यांनी लेखी पत्राद्वारे कळवून कार्यालयातील बायोमॅट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर पुन्हा सुरु करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

त्यानुषंगाने कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी कार्यालयात येताना व कार्यालय सोडताना त्यांची उपस्थिती बायोमॅट्रिक प्रणालीवरच नोंदविण्यात यावी.आपल्या कार्यालयातील बायोमॅट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर सुरु केल्या बाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावा असे लेखीपत्राद्वारे गटविकास अधिकारी पं.स.चाकूर,गट शिक्षण अधिकारी,पं.स.तालुका आरोग्य अधिकारी,मुख्याधिकारी, नगरपंचायत,वनक्षेत्रपाल,सामाजिक वनीकरण,बाल विकास प्रकल्प अधिकारी, पं.स.उप अधिक्षक,भुमी अभिलेख:उप कोषागार अधिकारी,तालुका कृषी अधिकारी:उप विभागीय अभियंता,सा.बां. उप विभाग,उप विभागीय अभियंता, जि.प.बांधकाम,वैद्यकीय अधिक्षक,ग्रामीण रुग्णालय,दुय्यम निबंधक,दुय्यम निबंधक कार्यालय,सहा.निबंधक,सह.संस्था,प्राचार्य, शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,उप विभागीय अभियंता,म.रा.वि.कंपनी,उपअभियंता, म.रा.वि.कंपनी,गृहपाल शासकीय मुलांचे वस्तीगृह,गृहपाल,शासकिय मुलींचे वस्तीगृह,पशु वैद्यकीय अधिकारी,पशु चिकित्सालय,तालुका बीज गुणन केंद्र,तालुका फळ रोपवाटिका या सर्व कार्यालयांना कळविले आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.