आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोथीच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी नालीच्या घाण पाण्यात पाय भिजवून मंदिरात करावा लागतो प्रवेश….!

बोथीचे ग्रामसेवक करडीले हे उंटावर बसून राखतात शेळ्या,जनतेला देतात फक्त पोपटपंची आश्वासने..

संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज चाकूर,लातुर मो-9766553995

बोथीच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात नालीच्या घाण पाण्यात पाय भिजवून दर्शनासाठी करावा लागतो प्रवेश….!

बोथीचा ग्रामसेवक करडीले हा जनतेला देतो पोपटपंची रिकामी आश्वासने… 

सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ति!
रखुमाईच्या पती सोयरिया!!
गोड तुझे रुप गोड तुझे नाम!
देई मज प्रेम सर्व काळ!!
विठो माऊलिये हाचि वर देई!
संचरोनि राही ह्दयामाजी!!
तुका म्हणे काही न मागे आणिक!
तुझे पायी सुख सर्व आहे!!

महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आपण चंद्रभागेच्या कुशीत वसलेल्या पंढरपूर या गावी जातो तर अगदी त्याचप्रमाणे आपल्या बोथी नगरीमध्ये विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिराची उभारणी करुन कमीत कमी पाच वर्षाचा कालावधी उलटला आहे तरी या मंदिराच्या सभोवताली झालेले घाणीचे साम्राज्य कधी कमी होणार याकडे बोथी वासीयांचे लक्ष लागले आहे.

चाकूर तालुक्यातील बोथी गावाची ओळख म्हणजे चाकूर शहराला बोथी साठवण तलावातून पिण्याचे पाणी पुरवठा केले जाते.याच बोथी गावात घाणीचे साम्राज्य खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येत आहे.बोथी व तांड्यातील अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत चिकनगुनियाची साथ पसरलेली आहे हे कशामुळे तर फक्त आणि फक्त या गावात स्वच्छता नसल्याने डेंगू सारख्या रोगाने डोके वर काढले आहे.वेळेवर फवारणी केली जात नाही म्हणून या मोठ्या आजारांना येथील जनतेला तोंड द्यावे लागत आहे.

गावातील नाल्या हे बाथरुमच्या घाण पाण्याने तुडुंब भरुन वाहत आहेत,वेळेवर गावातील नाल्या साफसफाई न केल्याने नालीतून वाहणारे पाणी हे नाली या केरकचर्याने तुंबून रस्त्यावरुन पाणी वाहत असल्याचे चित्र सद्या तरी बोथी गावात ठिकठिकाणी दिसून येत आहे. बोथी गावातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात सकाळी व संध्याकाळी भाविकांची दर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते काल महाशिवरात्रीच्या पवित्र सणाच्या दिवशीही याच भाविक भक्तांना मंदिराच्या समोरील रस्त्यावरुन वाहणाऱ्या नालीच्या घाण पाण्यात पाय भिजवून मंदिरात दर्शन घेण्यासाठी प्रवेश करावे लागले किती मोठी शोकांतिका आहे असे म्हणले तरी काही वावगे ठरणार नाही आणि अगदी ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे मंदीर असल्याने लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांना हात धरुन हे स्थळ दाखवले असता या नालीच्या पाण्याची विल्हेवाट लावतो असे ग्रामविकास अधिकारी करडीले डी.जी यांनी सांगितले होते,परंतु त्यांच्या या सांगण्याने उंटावर बसून शेळ्या राखण्याचे काम सध्या हे ग्रामसेवक करीत आहेत असे दिसून येत आहे.

प्रशासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोथी या ग्रामीण पातळीवरील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना जाब विचारणे खूप महत्त्वाचे आहे,बोथी ग्रामपंचायतीने साफसफाई व गावातील जनतेच्या आरोग्य सेवेकडे लक्ष द्यावे अशी गावातील महिला-भगिनी व नागरिकांची मागणी आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.