आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

अजनसोंडा येथे १ कोटी १४ लाख २५ हजार रुपयांच्या कामाचा भूमिपूजन व बांधकाम कामगारांना भांडी वाटप….

आ.बाबासाहेबजी पाटील यांच्याहस्ते १ कोटी १४ लाख २५ हजारांचे भूमिपूजन.....

संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो-9766553995

१ कोटी १४ लक्ष २५ हजार रुपयांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा आणि बांधकाम कामगारांना भांडी वाटप…..! 

अजनसोंडा येथे विविध विकास निधी अंतर्गत १ कोटी १४ लक्ष २५ हजार रुपयांच्या कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा चाकूर-अहमदपूर विधानसभेचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून केलेला सन्मानही स्वीकारला.तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ लातूर व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने नोंदणीकृत बांधकाम कामगार बांधवांना संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.

यामध्ये स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत सभागृह लोकार्पण ३० लक्ष रु.सामाजिक न्याय विभागातंर्गत सभागृह लोकार्पण १५ लक्ष रु. जनसुविधा योजनेतंर्गत सिमेंट रस्ता ९.२५ लक्ष रु.मूलभूत सुविधा योजनेतंर्गत भाकरवाडी पेव्हर ब्लॉक लोकार्पण १० लक्ष रु., एम.आर.ई.जी.एस योजना अंतर्गत ५० लक्ष रु. कामाचा भूमिपूजन सोहळा अशा एकूण १ कोटी १४ लक्ष २५ हजार रुपयांच्या कामांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य शिवजीराव माने, सरपंच देविदासराव माने,उपसरपंच आबासाहेब माने,राम रेचवाडे, शिरूर ग्रा.प.सदस्य अनिलजी लामतुरे,अजीज शेख,संदीप तोंडारे,विकास सावरगावे,ग्रा.प. सदस्य बिरोबा शेवाळे,ग्रा.प.सदस्य रशीद शेख, सिकंदर शेख,ग्रा.प.सदस्य शिवाजीराव हाके, ग्रा.प.सदस्य गंगाधरराव भालेराव,पोपट जोशी, ज्ञानेश्वर पाटील,बालाजी माने,महेश स्वामी, राजेंद्र हादवे,सुधाकर भालेराव,पोलीस पाटील व्यंकटराव पाटील,विष्णू सूरवसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जोशी व गणेश स्वामी यांनी केले.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.