आरोग्य व शिक्षण

शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांना खाली बसून द्यावी लागली परिक्षा

चाकूर येथील भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालयातील घटना

मुख्य संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज चाकूर,लातुर मो-9766553995

विद्यार्थ्यांना चक्क खाली बसून द्यावी लागली शिष्यवृत्तीची परिक्षा…

चाकूर येथील भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालयातील घटना.

शासनाकडून शिक्षणासाठी भरमसाठ निधी खर्च केला जातो परंतु आज खाजगी संस्थाही शासनाच्या ताब्यात असून संस्थेलाही निधी खर्च केला जातो तरीपण खाजगी संस्थेमध्ये भौतिक सोय सुविधा व शालेय सुविधा उपलब्ध नाहीत तसेच आज दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली.या परीक्षा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकड्यांची सुविधा नसल्याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आलेल्या संपूर्ण चाकूर तालुक्यातील खेडेगावातून आलेल्या विद्यार्थ्यांना चक्क खाली बसून शिष्यवृत्तीची परीक्षा द्यावी लागली ही घटना चाकूर शहरातील लोकायत शिक्षण संस्थेद्वारा संचलित असलेल्या भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालयातील परिक्षा केंद्र क्रमांक-810651 मध्ये हे चित्र दिसून आले.

भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालयात दोन सत्रामध्ये परिक्षा घेण्यात आली,पहिल्या सत्रामध्ये शिष्यवृत्तीची परीक्षा सुरु असताना एकूण ९ वर्ग खोलीमध्ये १९८ विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्तीची परीक्षा देण्यासाठी या केंद्रावर उपस्थित होते यामध्ये खोली क्रमांक ५ मधील विद्यार्थ्यांना खाली बसून परीक्षा द्यावी लागली.

पहिल्या सत्राची परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी घरूनच जेवणाचा डबा घेऊन परीक्षेसाठी आले होते परंतु या विद्यार्थ्यांना जेवण केल्यानंतर या शाळेत पिण्याच्या पाण्याची सुविधाही नव्हती एकीकडे बघितलं तर ज्ञानगंगा घरोघरी असे उपक्रम शासनाने राबवतात यामध्ये बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणानंतर पिण्यासाठी पाण्याची सुविधा या भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालयात मिळाली नाही हे बघितलं तर खूपच मोठी शोकांतिका आहे.या शाळेमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीची परीक्षा असून सुद्धा या शाळेचा सेवक आज एकही या परीक्षा केंद्रावर उपस्थित नव्हते व परीक्षेच्या वेळेची घंटा वाजवण्यासाठी लहान मुले बोलावून येथील परीक्षेच्या वेळेची घंटा वाजवली गेली.

या परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून श्रीमती पुट्टेवाड सुप्रिया,मोहीते एम एस,शेख ए.जी,मिरकले एन व्ही,बडे भक्तराव,पाटील संतोष,गुजरे महादेव,माने आर व्ही,शेख माजीद,गुजरे महादेव व केंद्र संचालक भरत कोरे आणि सहाय्यक म्हणून मुंडे हे उपस्थित होते.

आम्हाला पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही आमच्या भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालय या शाळेवर केंद्र नको होते,तरीही आम्हाला जबरदस्तीने आमच्या शाळेवर परीक्षा केंद्र ठेवण्यात आले आहे असे या शाळेच्या मुख्याध्यापिका यांचे म्हणणे आहे.                                                        मुख्याध्यापिका                       संजीवनी पवार

 

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालय या केंद्राची पाहणी केली असता एका वर्गातील विद्यार्थी खाली बसून परीक्षा देत होते तरी त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रात बाकाची सुविधा करुन देण्याची सुचना देण्यात आले व काही शाळेत घाणीचे साम्राज्य वाढले आहे ते काढण्यासाठी मी तत्परतेने प्रयत्न करीत आहे.
गटशिक्षणाधिकारी चाकूर.
           जयसिंग जगताप

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.